Mira Road Crime: मीरारोड हत्याकांडाच्या (Saraswati Vaidya Murder Case) तपासात नवनवीन खुलासे होत आहेत. सरस्वती वैद्य यांनी विष पिऊन आत्महत्या केल्याचं आरोपीने पोलिसांना सांगितलं होतं. मात्र आता याबाबत नवीन माहिती समोर आली आहे. सरस्वती वैद्य यांच्या हत्येपूर्वी आरोपी मनोज सानेने बोरिवलीतील नर्सरीच्या दुकानातून कीटकनाशक खरेदी केल्याचं समोर आले आहे. पोलीस आरोपीला नर्सरीच्या दुकानात घेऊन गेले होते. त्या ठिकाणी झालेल्या चौकशीत हा खुलासा झालाय. त्यामुळे आरोपी सानेनेच विष पाजून वैद्य यांची हत्या केलीये का याचा तपास आता पोलीस करत आहेत.
पालिकेचा कर्मचारी सरकारी पंच
सोमवारी दुपारी पोलिसांनी आरोपी सानेला बोरीवलीच्या बाभई येथील एका नर्सरीच्या दुकानात नेले होते. तेथे केलेल्या चौकशीत साने यानेच किटकनाशक खरेदी केल्याच उघड झालं आहे. त्यामुळे सानेनं तिला विष देऊन, तिची हत्या केली का याबाबत आता पोलीस तपास करत आहेत.साने आणि सरस्वती यांच्या मोबाईलची आणि सीडीआरची पोलीस आता कसून तपासणी करत आहेत. या गुन्ह्याचे गांभीर्य पाहून पोलिसांनी मीरा-भाईंदर महापालिकेकडे सरकारी पंच मागितलं आहे. त्यासंबंधीचं पत्र नया नगर पोलिसांनी पालिकेच्या आयुक्तांना दिलं होते. पालिकेने ही पालिकेचा कर्मचारी सरकारी पंच म्हणून दिला आहे.
वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात लग्न केल्याची माहिती
काल सोमवारी मयत सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे तिच्या बहिणींनी जे.जे. रुग्णालयातून घेतले आहेत. त्यानंतर सरस्वतीवर मुंबईतील रे रोड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्याच बरोबर सोमवारी सरस्वतीच्या तिन्ही बहिणीचे डीएनए नमुने तपासणीसाठी ही घेण्यात आले आहेत.सानेने सरस्वतीसोबत मंदिरात लग्न केल्याची माहिती पोलिसांना सरस्वतीच्या बहिणीनी दिली होती. 2014 साली भिंवडीच्या वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात लग्न केल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळत आहे.
सीसीटीव्हीत प्रकार कैद
साने हा सरस्वतीच्या शरीराचे तुकडे करुन ते कुकरमध्ये उकडवत होता. आरोपी मनोज साने राहत असलेल्या इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तो सरस्वतीच्या शरीराचे अवयव एका पिशवीत घेऊन जाताना दिसत आहे. त्याचबरोबर आरोपी मनोज साने हा मृत सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे टाकताना अत्यंत सावधगिरी बाळगत असल्याचंही सीसीटीव्हीतून समोर आलं आहे. इमारतीची लिफ्ट सातव्या मजल्यावर थांबल्यावरच तो मृतदेहाच्या तुकड्यांनी भरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन घराबाहेर पडत असल्याचं दिसून येत आहे.
हेही वाचा: