मुंबई :  मुंबई क्राइम ब्रँचच्या सायबर सेलने बॉलिवूड आणि जाहिरातींमध्ये काम मिळवून देण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. अपूर्व अश्विन दौडा उर्फ ​डॉ. ऋषी श्रॉफ असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो 47 वर्षांचा आहे. त्याने आतापर्यंत 100 पेक्षा जास्त लोकांना गंडा घातला असून यातून 2 कोटींची रुपयांची माया जमावली असल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे.


सायबर सेलच्या डीसीपी डॉ. रश्मी करंदीकर यांनी सांगितले की, आमच्याकडे तक्रार आली होती की आरोपीने महेश गुप्ता जो विमानाच्या सुटे भागाचा ऑनलाइन व्यवसाय करतो त्याची ऑनलाइन 32 लाख 69 हजार रुपयांची फसवणूक केली होती. तेव्हापासून आम्ही आरोपीच्या मागावर होतो. आता त्याला अटक करण्यात आली आहे. अपूर्वविरोधात मुंबईतील साकीनाका, आंबोली, ओशिवरा, एन.एम. जोशी आणि दादर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.


करंदीकर म्हणाले की, अटक केलेले आरोपी झारा किड्स आणि जारा वर्ल्ड या दोन बनावट वेबसाइट्स चालवत असत, ज्याद्वारे तो लोकांशी संपर्क साधत असे. या व्यतिरिक्त तो लोकांना बल्क संदेश पाठवत असे, कि "आम्ही टेलिव्हिजन जाहिरातींसाठी कास्ट करीत आहोत. आपणास इंटरेस्ट असल्यास कृपया नाव, जन्मतारीख व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर पाठवा किंवा आम्ही बॉलीवूड चित्रपटांसाठी कास्ट करीत आहोत. आपल्या मुलाचे वय 2 ते 14 दरम्यान असेल तर कृपया आपल्या मुलांचा फोटो आणि जन्मतारीख पाठवा "


लोकांना सांगायचा की आपण "बच्चों की दुनिया" नावाचा चित्रपटाची निर्मिती करत असून त्याच चित्रपटासाठी मुलांना कास्ट करायचे आहे.


यानंतर अशा लोकांशी संपर्क साधून तो मुलाचे फोटोशूट करायचे आहे, मुलासाठी कपडे विकत घ्यायचेत अशा वेगवेगळ्या सबबी देऊन त्याच्याकडून पैसे उकळत असे. तपासादरम्यान असे आढळले की अपूर्वाने 100 पेक्षा जास्त लोकांची अशीच फसवणूक केली आहे. फसवणूक केलेले पैसे मिळवण्यासाठी त्याने 18 बँक खाती वापरली आहेत.


आरोपी सांगितले, की
अपुर्वने पोलिसांच्या चौकशीत सांगितले की, त्याने बर्‍याच कार्यक्रमांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. अमेरिकेच्या कोलोरॅडो येथील टीएफटी बिझिनेस स्कूलमधून अपूर्वचे शिक्षण झाले आहे. लोकेशन लपविण्यासाठी त्याने 9 मोबाइल फोन यातील 8 आयफोन आणि 1 सॅमसंग फोनचा वापर केलाय. पोलिसांना त्याच्याकडे 40 सिमकार्ड सापडले आहेत. अपूर्व देशाच्या वेगवेगळ्या राज्यात ऑफिस भाड्याने घेऊन लोकांची फसवणूक करायचा आणि लोकांशी संपर्क साधण्यासाठी व्हाट्सएप कॉलिंग व व्हीपीएन कॉलिंगचा वापर करीत असे.


अपूर्वने पोलिसांना सांगितले की, 2017 पासून तो या मार्गाने लोकांची फसवणूक करीत आहे. आतापर्यंत त्याने 2 कोटींपेक्षा जास्त पैसा यातून मिळवला आहे. आरोपीला महागड्या गाड्यांची खूप हौस होती. तो फिरण्यासाठी मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, पोर्चे यासारख्या लक्झरी वाहनांचा वापर करीत असे.