पालघर : सोशल मीडियाच्या माध्यमातून नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. तरुणींना आणि मैत्रिणींना नोकरीचं आमिष देऊन त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्यांची संख्या सोशल मीडियामुळे सध्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच पालघर सारख्या ग्रामीण भागातही आता अशा धक्कादायक घटना समोर येऊ लागलेल्या आहेत. पोचाडे येथील एका विकृताने महिलांना चांगली नोकरी लावून देतो असे सांगून महिलांवर अतिप्रसंग करायचा. धक्कादायक म्हणजे या प्रसंगाचे चित्रिकरण करुन ते वेबसाईटवर अपलोड करुन पैसे कमवत होता.


पालघर जिल्ह्यातील विक्रमगड मधील पोचाडे येथील मिलिंद झडे हा महिलांना ठाणे महानगर पालिकेत नोकरीचं आमिष देऊन त्यांच्यासोबत अतिप्रसंग करतानाचे व्हिडिओ चित्रित करायचा. हे व्हिडीओ पॉर्न साईटवर अपलोड करून लाखो रुपये कमवत होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालघर पालिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.


अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर सतत दोन दिवस सामूहिक बलात्कार; दोघांना अटक


ग्रामीण भागातील महिलांना नोकरीची फूस लावून अतिप्रसंग
तरुणीवर अतिप्रसंग करून त्याचे व्हिडिओ काढून पॉर्न साईटवर अपलोड करणाऱ्या एका आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पालघर पोलिसांना यश आलं आहे. पालघर मधील विक्रमगड तालुक्यातील पोचाडे येथिल मिलिंद झडे, असे या आरोपीचं नाव असून त्याला जंगलातून पालघर स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपी मिलिंद झडे हा बसमध्ये कंडक्टर म्हणून कार्यरत असून तो ग्रामीण भागातील महिलांना नोकरीची फूस देऊन जंगलात जाऊन त्यांच्यावर अतिप्रसंग करत असे. शिवाय मुलींवर अतिप्रसंग करताना व्हिडिओ काढून पॉर्न साईट वर टाकत असे. विशेष म्हणजे यातून त्याने हजारो डॉलर्सची कमाई देखील केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी विरोधात 376(n)(2), 452, 506 आणि आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


खाऊ देण्याच्या बहाण्याने दोन मुलींना पळवण्याचा प्रयत्न, आरोपी रिक्षा चालकाच्या मुसक्या आवळण्यात यश