वर्धा : वर्ध्यात  एमपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणाने आत्महत्या केली आहे. किसनने  नैराश्यातून आत्महत्या केल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली आहे.  परीक्षेत नियुक्त न झाल्याने नैराश्यातून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे 


तरुणाने मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत नोकरी मिळत नसल्यामुळे आत्महत्या करत असल्याचं म्हटले आहे. किसन ढगे (वय 29) असं आत्महत्या केलेल्या तरूणाचं नाव आहे.  देवळी तालुक्यातील नागझरी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात किसन परिचारक म्हणून काम करत होता. MPSC परीक्षेत नियुक्त न झाल्याने नैराश्यातून आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना हे पत्र लिहिले आहे. 




देवळी तालुक्यातील नागझरी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील  पंख्याला गळफास घेत जीवनयात्रा संपवली. किसन गेल्या 10 वर्षांपासून MPSC च्या परीक्षा द्यायचा. PSI होण्याचे त्याचे स्वप्न होते.  पण यावेळी तोंडचा आलेला घास दूर गेला. अशातच त्याच्या मित्रांच्या नियुक्त्या झाल्या मात्र  किसनला अपयश आले. 


 किसनने सकाळी मित्रांसोबत जेवण केले व फोटो काढले.  त्याने चिठ्ठीत लिहल्याप्रमाणे आई वडिलांनी शेती विकून शिक्षण शिकविले पण अपेक्षेप्रमाणे नोकरी लागली आहे.  किसन गेल्या पंधरा दिवसापासून दुःखी होता. दवाखान्यात येताच भरती घोटाळ्याबाबत  निषेध करत जीवनयात्रा संपवत असल्याची माहिती मिळाली आहे. तरुणांना शिक्षण घेतल्यानंतर अपेक्षेप्रमाणे नोकरी लागत नसल्याने तरुण वैफल्यग्रस्त आहेत. असाच एक बळी शासनाच्या धोरणाने घेतला असल्याचे बोलले जात आहे.


संबंधित बातम्या :