Maharashtra Sangli Crime News : वाळवा तालुक्यातील येलूर नजीक राज्य उत्पादन शुल्क इस्लामपूर विभागानं कारवाई केली आहे. या कारवाईत गोवा बनावटीची 6 लाख 5 हजार 520 रूपयांचं विदेशी मद्य जप्त केलं आहे. तर इतर मुद्देमाल असा एकूण अंदाजे 51 लाख 7, 780 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन संशयीत आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. गोवा बनावटीच्या विदेशी मद्यासह सहाचाकी कंटेनर, एक ब्रिझा गाडी आणि कंटेनरमधील इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु असून तपास निरिक्षक राज्य उत्पादन शुल्क अधिकारी प्रशांत रासकर यांच्या नेतृत्त्वात पुढील तपास सुरु आहे. 


गोव्याहून पुण्याकडे गोवा बनावटीचे विदेशी मद्य घेऊन येलूर मार्गे कंटेनरमधून वाहतूक करण्यात येणार असल्याची माहीती राज्य उत्पादन शुल्क विभाग इस्लामपूर यांना मिळाली. येलूर येथे सापळा रचून गोवा बनावटीचे विदेशी मद्य, सहा चाकी कंटेनर, एक ब्रिझा गाडी आणि कंटेनरमधील इतर मुद्देमाल असा एकूण 51,07,780 रूपयांचा मुद्देमाल रीतसर कारवाई अंतर्गत जप्त करण्यात आला. काल (रविवारी) दुपारी 3.15 वाजता ही कारवाई करण्यात आली. 180 मिलीच्या 3840 बाटल्या आणि मालवहातूक करणारा कंटेनर एमएच 12 क्यूजी 2279 आणि त्यासोबतच पायलेटींग कार ब्रीझा एम.एच 50एल 9970 कार आणि इतर माल जप्त करण्यात आला आहे. 


कारवाई मा.आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई कांतीलाल उमाप, विभागीय  उपायुक्त मा.वाय.एम.पवार यांचे आदेशान्वये अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क सांगली संध्याराणी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क इस्लामपूर निरिक्षक प्रशांत रासकर, उपनिरीक्षक शंकर रनपिसे, उपनिरीक्षक अविनाश घाटगे, साहयक उपनिरीक्षक उदय पुजारी जवान राकेश बनसोडे, संतोष वेदे आणि इतर यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :