Maharashtra Mumbai News : दिल्लीतली जहांगीरपुरीमधील धार्मिक हिंसाचाराची घटना ताजी असताना आता राज्यातही चाललंय काय असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. कारण धार्मिक वादातून राजधानी मुंबईच्या आरे कॉलनीत काल रात्री वाद शिगेला पोहोचला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं वाद निवळला सध्या या परिसरात कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यात इतर ठिकाणीही वाद उसळला होता. अमरावतीच्या अचलपूर आणि परतवाडा शहरात आणि तर अचलपूर शहरातल्या दुल्ला गेट परिसरात झेंडा हटवण्याच्या वादातून दोन गट आमने सामने आले. त्यामुळे संपूर्ण राज्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. ठिकठिकाणी पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणा आली आहे.
मुंबईतील आरे कॉलनीत दोन गटात तुफान राडा झाला. शिवमंदिरातील कळस यात्रेदरम्यान दोन गटांमध्ये हाणामारी झाली होती. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली असून आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं वाद निवळला सध्या या परिसरात कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आलेय. तर इकडे मुंबईच्या आरे कॉलनीत शिव कलश यात्रेच्या मिरवणुकीत दोन गटात वाद झाला आणि त्याचं पर्यावसन हाणामारीत झालं. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील 25 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
मुंबईतल्या आरे कॉलनीतील गौतम नगर भागात काल रात्री दोन गटात तुंबळ राडा झाला. परिसरातील शिवमंदिरातील कळस यात्रेदरम्यान रात्री 8 वाजता दोन गटात वाद झाला आणि या वादाचं पर्यावसन हाणामारीत झालं. या हाणामारीत 8 ते 10 जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमाव पांगवला आणि गोंधळ घालणाऱ्यांना ताब्यात घेतलं होतं. या घटनेसाठी पोलिसांनी 25 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. आणखी काही आरोपींचा शोध सुरू आहे. सध्या या परिसरात तणावपूर्ण शांतता असून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :