Osmanabad Crime News: उस्मानाबाद जिल्ह्यात (Osmanabad District) खळबळजनक घटना समोर आली असून, एका शिक्षकाने (Teacher) आपल्या सहकारी शिक्षकाचा खून केला आहे. आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. श्यामराव देशमुख असे मयत शिक्षकाचे नाव असून, धीरज हुंबे असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून शिक्षकानेच शिक्षकाचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना उस्मानाबाद शहरात घडली. शहरातील भगिरथी कॅालनी भागात मंगळवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली आहे. श्यामराव देशमुख असे मयत शिक्षकाचे नाव असून, धीरज हुंबे आरोपीचे नाव आहे. तर श्यामराव देशमुख आणि हुंबे हे दोघे शहरातील भोसले हायस्कूलमध्ये शिक्षक आहेत.
दरम्यान, मंगळवारी सायंकाळी दोघांमध्ये आर्थिक देवाणघेवाणीच्या कारणावरून वाद झाला. पुढे वाद विकोपाला गेला आणि धीरज हुंबे याने देशमुख यांच्या डोक्यात दगडाने मारहाण करायला सुरुवात केली. या मारहाणीत देशमुख गंभीर जखमी झाले होते. त्यांना तत्काळ उस्मानाबादच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, डॉक्टरांनी मयत घोषित केले. याप्रकरणी मयत शिक्षकाचा मुलगा वैभव देशमुख याने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर पोलिसांकडून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू असल्याचे कळत आहे.
शिक्षण क्षेत्रात उडाली खळबळ
श्यामराव देशमुख आणि धीरज हुंबे दोघेही उस्मानाबादच्या शहरातील भोसले हायस्कूलमध्ये शिक्षक आहेत. दोघेही एकाच शाळेत शिक्षक असल्याने त्यांची चांगली ओळख आहे. दरम्यान, दोघांनामध्ये काही दिवसांपासून आर्थिक देवाणघेवाण सुरू होती. मात्र याच आर्थिक देवाणघेवाणमध्ये दोघांत वाद सुरू झाले होते. हा वाद एवढ्या विकोपाला गेला की, दोघांमध्ये थेट भांडण झाले आणि त्यातून मारहाण झाली. याच मारहाणीत श्यामराव देशमुख मृत्यू झाला आहे. तर या घटनेने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
पोलिसांची घटनास्थळी धाव...
मंगळवारी सायंकाळी श्यामराव देशमुख आणि धीरज हुंबे या दोघांमध्ये आर्थिक देवाणघेवाणीच्या कारणावरून वाद झाला. याच वादात धीरज हुंबे यांनी श्यामराव देशमुख यांना दगडाने मारहाण करून त्यांचा जीव घेतला. दरम्यान, याची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. तर महिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी रुग्णालयात जाऊन घटनेची माहिती घेतली. सोबतच मारहाण झालेल्या घटनास्थळी जाऊन पोलिसांकडून, पंचनामा देखील करण्यात आला आहे. तसेच, मयत शिक्षक श्यामराव देशमुख यांचा मुलगा वैभव देशमुख याने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्याच्या प्रकिया सुरू असल्याचे समोर येत आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :
Aurangabad: 'मुल होत नाही, नवरा म्हणाला जीव दे'; महिला थेट तलावावर पोहचली अन्....