Beed Crime News : बीडच्या (Beed) माजलगाव तालुक्यातील नित्रुड एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, एका अल्पवयीन मुलाचा झाडाला संशयास्पदरीत्या गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. तर हा घातपाताचा प्रकार असल्याचा आरोप तरुणाच्या कुटुंबातील सदस्यांनी केला आहे. त्यामुळे नित्रुड परिसरात खळबळ उडाली आहे.  गुलाब मोहंमद मुर्तुजा शेख (वय 14 वर्षे, रा. नित्रुड, ता. माजलगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. 


पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बीडच्या माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथील 14 वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गुलाब मोहंमद मुर्तुजा शेख असे या मुलाचे नाव आहे. याबाबत मात्र नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून, घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. गुलाब मोहम्मद मुर्तजा शेख याला रस्त्यात अडवून हत्या करत मृतदेह झाडाला लटकवल्याची आरोप नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, पुढील तपास करण्यात येत आहे. 


घातपाताचा प्रकार असल्याचा कुटुंबाचा आरोप...


याबाबत मुलाच्या नातवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, नित्रुड येथील गुलाम मोहम्मद हाफिज मुर्तजा शेख हा आपल्या बहिणीसोबत सरपण आणण्यासाठी सकाळी सात वाजता घराबाहेर पडला होता. दरम्यान, बहीण-भाऊ रस्त्याने जात असताना, तीन ते चार व्यक्तींनी गुलाम मोहम्मदला रस्त्यात अडवले. त्यानंतर  त्याला मारहाण करण्यात आली. आपल्या भावाला चार व्यक्ती मारहाण करत असल्याने गुलाम मोहम्मदची बहिण घाबरलेल्या अवस्थेत घराकडे पळाली. तसेच घरी जाऊन घडलेला प्रकार सांगितला. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र एका झाडाला संशयास्पदरीत्या गळफास घेतलेल्या अवस्थेत गुलाम मोहम्मद हाफिजचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे हा घातपाताचा प्रकार असून, आरोपीस तात्काळ अटक करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.


पोलिसांकडून तपास सुरु...


बीडच्या माजलगाव तालुक्यातील नित्रुड परिसरात एका 14 वर्षीय तरुणाचा गळफास अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, पोलिसांनी मुलाचा मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. मात्र हा घातपाताचा प्रकार असल्याचा आरोप मुलाच्या नातवाईकांनी केला असल्याने, पोलिसांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतलं आहे. सोबतच दोन्ही बाजूने तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. तर शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावर सर्व काही स्पष्ट होईल, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Beed News : काय सांगता! गावातील चहाच्या टपरीसाठी तब्बल 30 लाखाची बोली; गावकऱ्यांनी तोंडात बोट घातले