Aurangabad Crime News: औरंगाबाद (Aurangabad) शहराच्या बालाजीनगर परिसरात धक्कादायक घटना समोर आली असून, एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे, आत्महत्या करणारा तरुण एका महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होता. दरम्यान, शनिवारी सकाळी जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दातील बालाजीनगर भागांत त्याने आत्महत्या केली आहे. मुकेश नागोराव गव्हांदे (वय 30 वर्षे, रा. चौंढी टाकळेश्वर, ता. संग्रामपूर, जि. बुलडाणा) असे या युवकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुकेश गव्हांदे हा युवक डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य महाविद्यालयात एम. ए. (अर्थशास्त्र) चे शिक्षण घेत होता. तर महाविद्यालयाच्या वल्लभी वसतिगृहात तो राहत होता. केटरिंगचे काम करून तो शिक्षण घेत होता. केटरिंगचे काम करीत असतानाच तिथे काम करत असलेल्या एका महिलेसोबत त्याची ओळख झाली. दरम्यान, काही महिन्यांपासून ते दोघे बालाजीनगर भागांत एक खोली किरायाने घेऊन लिव्ह इन रिलेशनमध्ये राहू लागले.
मात्र, शनिवारी सकाळी मुकेशने आपण राहत असलेल्या याच खोलीतील लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यावेळी सोबत राहणारी महिला घरामध्येच झोपलेली होतो, असे महिलेने पोलिसांना सांगितले आहे. झोपेतून उठल्यानंतर आपल्याला ही बाब दिसून आली. या घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मुकेशला घाटीत दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले, असल्याची माहिती महिलेने दिली आहे.
महिलेवर गंभीर आरोप...
दरम्यान, मयताचा लहान भाऊ लखन याने सांगितले की, संबंधित महिला मुकेशला ब्लॅकमेल करत होती. सोबत न राहिल्यास मारण्याची धमकी देत होती. तिच्या धमक्यांना कंटाळूनच त्याने हे पाऊल उचलले असावे किंवा संबंधित महिलेनेच त्याला मारून टाकले असावे, अशी शंकाही त्याने उपस्थित केली. या प्रकरणी लवकरच पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याचंही मृत मुकेशच्या भावाने सांगितले. सध्यातरी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास जवाहरनगर पोलीस करत आहेत.
सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या...
दरम्यान दुसऱ्या एका घटनेत सासरच्या छळाला कंटाळून गारखेडा परिसरात राहणाऱ्या 28 वर्षीष उच्चशिक्षित असलेल्या महाविद्यालयातील प्राध्यापिकेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रा. वर्षा दीपक नागलोत (वय 28 वर्षे, रा. गजानन कॉलनी, गारखेडा परिसर) असे आत्महत्या केलेल्या प्राध्यापिकेचे नाव असून, ती सात महिन्यांची गर्भवती होती अशी माहिती तिच्या नातेवाइकांनी दिली आहे. दरम्यान, मयत विवाहितेचा मृतदेह रुग्णालयाच्या अपघात विभागात सोडून सासरकडील मंडळीने धूम ठोकली होती. याप्रकरणी शहारतील पुंडलीकनगर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :
राज्यात पुन्हा परळीतील मुंडे गर्भपात प्रकरणाची पुनरावृत्ती; औरंगाबाद हादरलं! आरोग्य विभागात खळबळ