जालना : कौटुंबिक कलहातून जावायाने सासूची डोक्यात फरशी घालून खून केला आहे. शहरातील प्रियदर्शनी कॉलनीत मध्यरात्री जवायाने आपल्या सासूचा खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. रात्री पोलीसांना माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता ही माहिती समोर आली.
ज्योती धिल्लोड या मजुरी करणाऱ्या महिलेचा 2005 साली औरंगाबाद येथील भावसिंगपुरा येथे राहणाऱ्या विजय धिल्लोड याच्याशी विवाह झाला होता. मात्र पाच वर्षांपूर्वी पतीच्या संशयी वृत्तीला आणि रोजच्या मारहाणीला कंटाळून ज्योती आपली आई सखुबाई काळे यांच्याकडे राहण्यास आली. दरम्यान या काळात दोघा पती पत्नीचे खटके उडत होते.
ज्योती ही एका विटभट्टीवर मजुरी करत होती. तर तिची आई सखुबाई 15 वर्षांपासून एका मार्बलच्या दुकानात वॉचमन म्हणून काम करत होत्या. पोलिसांच्या माहितीनुसार 23 नोव्हेंबर रोजी रात्री 12.30 च्या सुमारास आरोपी विजय धिल्लोडने कामावर असलेल्या आपल्या सासू ला दुकानावर गाठलं. यावेळी दोघांमध्ये भांडण होऊन वाद विकोपाला गेला आणि अगोदरच तयारीत असलेल्या आरोपी जावई विजयने आपल्या सासुच्या डोक्यात जवळची फरशी घातली, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मयत सुखूबई काळे यांची मुलगी ज्योतीने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी विजयने मुलांना आपल्याजवळ म्हणजेच औरंगाबाद येथे घेऊन जाण्याचा आग्रह धरत होता. अनेक वेळा या मुद्द्यावरून दोघां पती पत्नीत वाद देखील झाले. यावेळी ज्योतीची आई सखुबाई यांनी मुलांना औरंगाबादला घेऊन जाण्यास विरोध केला. दरम्यान पत्नी तसेच सासूचा आपली मुले घेऊन जाण्यास विरोध असल्याचे लक्षात आल्यानंतर या सर्व वादाला आपली सासूच कारणीभूत असल्याचा समज आरोपी विजयचा झाला आणि याच कारणाने त्याने आपल्या सासूची हत्या केल्याचं समोर आलं.
या घटनेनंतर अवघ्या काही मिनिटात पोलीस घटनास्थळावर पोहोचली होती आजूबाजूच्या नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपी हा शहरातील चमन भागात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी या ठिकाणी एक पथक रवाना करून मध्यरात्रीचा आरोपीला जेरबंद केलं,आरोपीने हत्येची कबुली दिली असून त्याच्या विरोधात शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.या प्रकरणी आज आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
संबंधित बातम्या :