लातूर : दोन मावस बहिणींनी एकाच साडीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लातूर येथे घडली आहे. आत्महत्या केल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. आत्महत्यास प्रवृत केल्याप्रकरणी एका व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले आहे.
धनश्री संतराम क्षीरसागर (वय 19, कानेगाव ता. लोहरा जि. उस्मानाबाद) आणि तिची मावस बहिण गीतांजली बनसोडे (वय 17 ) अशी या मृत बहिणींची नावे आहेत. या दोघींचा मृतदेह आज सकाळी घरात आढळून आला. गीतांजलीच्या हरगुळ येथील घरात एकाच साडीने दोघींनी गळफास घेत आत्महत्या केली आहे. या बाबत एमआईडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले आहे. या प्रकरणात एका व्यक्तिस आत्महत्येस प्रवृत केल्याच्या कारणावरुन ताब्यात घेण्यात आले आहे.
धनश्री ही बारावी पास होती तर गीतांजली ही बारावीत होती. घरात याच्या लग्नाचा विषय सुरु होता. 'आम्हाला आताच लग्न करायचे नाही', असा हट्ट त्यांनी धरला होता. दरम्यान याच काळात त्याच्या मनात घरातून पळून जाण्याचा विचार आल. 17 जूनला या मुली पुण्याला घरातून न सांगता गेल्या होत्या. हरंगुळ येथील पंकज सुतार या इसमाने या बहिणींना फूस लावल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. 21 जूनला एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल होता. या दोन्ही मुलींना 1 जुलैला लातुरला परत आणले गेले होते. त्या दिवसांपासून त्या त्रस्त होत्या. आज सकाळी घरात त्याचे मृतदेह आढळून आले. नातेवाईक यामुळे हादरुन गेले आहेत. पंकज सुतार यास एमआयडिसी पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.
या प्रकरणी 'तात्काळ कारवाई करा...गुन्हा दाखल करा..आरोपीस अटक करा' अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. घटनेनंतर नातेवाईक चांगलेच आक्रमक झाले होते. पोलिसांनी शवविच्छेदन आहवाल आल्यावर सगळे चित्र स्पष्ठ होईल असे सांगितल्यानंतरही नातेवाईक शांत होत नव्हते. या वेळी मुलीचा मामा एमआयडिसी पोलिस ठाण्याच्या लोखंडी कमानीवर चढला तेथून खाली पडल्यामुळे हाताला जबर मार लागला. शवविच्छेदन अहवाल आल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी पंकज सुतार पोलिसांच्या ताब्यात आहे. यानंतर नातेवाईकांचा आक्रोश कमी झाला आहे.