कल्याण : कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात भारतीय चलनाच्या बनावट नोटा वटविण्यासाठी आलेल्या तीन तरुणाना कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी सापळा रचत बेड्या ठोकल्या आहेत. रजनिशकुमार चौधरी,हर्षद खान ,अर्जुन कुशवाह अशी तीन आरोपींची नावे आहेत.या तिघांकडून 39 हजार 500 रुपयांच्या बनावट नोटा आणि नोटा बनवण्याचं साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.
विशेष म्हणजे हे तिन्ही आरोपी 19 वर्षाचे आहेत यामधील रजनीशकुमार हा मुख्य आरोपी असून तो एडिटिंग प्रिंटिंग मध्ये निष्णात होता. तो हर्षद व अर्जुन च्या मदतीने या नोटा बनवत होता आणि त्या चलनात वटवत होता.तीन महिन्यापासून त्यांनी हे काम सुरू केलं होतं या कालावधीत त्यांनी किती नोटा बनवल्या,चलनात आणल्या त्यांचा आणखी कुणी साथीदार आहे का?याचा तपास पोलीसांनी सुरु केला आहे.
काही तरुण बनावट चलनी नोटा वटविण्यासाठी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात येणार असल्याची कल्याण महात्मा फुले पोलिसाना मिळाली होती.या माहितीच्या आधारे पोलीसांनी या परिसरात सापळा रचला.यावेळी या परिसरात वावरणाऱ्या या तीन तरुणाचा संशय आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.त्यांची झडती घेतलीअसता त्यांच्याकडे भारतीय चलनातील 50, 100 , 200 रूपये दराच्या एकुण 25 हजाराच्या बनावट नोटा मिळून आल्या. पोलिसांनी या तिघा तरुणांविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला.
रजनिशकुमार चौधरी, हर्षद खान, अर्जुन कुशवाह असून हे तिघे कल्याण पूर्व परिसरात राहणारे आहेत.रजनीशकुमार यांच्या घरात या नोटा बनवल्या जात होत्या त्यानंतर त्या बाजारात वटवल्या जात होत्या. पोलिसांनी रजनिश कुमार यांच्या घरावर छापा टाकला. त्याच्या घरातून 500, 200 ,100, 50 रुपये किमतीच्या 14 हजार 500 रुपये बनावट नोटा तसेच नोटा बनवण्यासाठी लागणारे कलर प्रिंटर ,कलरच्या डब्या बाटल्या ,लिक्विड डबे, वॉटर मार्क पेपर त्यावर महात्मा गांधी यांचा फोटो कागदाचे रिम आदी मुद्देमाल जप्त केला आहे .तीन महिन्यापासून हे तिघे बनावट नोटा बनवण्याचं काम करत होते. त्यांनी अद्याप किती नोटा बनवल्या किती नोटा वर ठेवला त्यांचा आणखी कोण साथीदार आहे का याचा तपास पोलिस करत आहेत