Latur : लातूरच्या बाळू डोंगरे हत्या प्रकरणात मोठी अपडेट पुढे आली आहे. यातील आरोपी डॉक्टर प्रमोद घुगे यास सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दोन दिवसापूर्वी डॉक्टर प्रमोद घुगे यास हरिद्वारमधून अटक करण्यात आली होती. दहा दिवसांपूर्वी बाळू डोंगरे या सिक्युरिटी सुपरवायझरचा खून झाला होता. या खुणातील आरोपी डॉक्टर प्रमोद घुगे त्या दिवसापासून फरार होता. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासासाठी तीन पथके रवाना करण्यात आली होती. शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने कारवाई करत हरिद्वार या ठिकाणी लपून बसलेले डॉक्टर प्रमोद घुगे यांना दोन दिवसापूर्वी अटक करण्यात आली होती.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने आज त्यांना लातूरच्या कोर्टात हजर केलं. कोर्टाने सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यातील दुसरा आरोपी अद्याप फरार आहे. सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
लातूर शहरातच नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये प्रसिद्ध किडनी रोग तज्ञ म्हणून डॉक्टर प्रमोद घुगे यांचा नावलौकिक आहे. त्यांच्या आयकॉन हॉस्पिटल येथील सिक्युरिटी सुपरवायझर बाळू डोंगरे याची आठ दिवसांपूर्वी हत्या झाली होती. आर्थिक देवाणघेवाणीवरून डॉक्टर आणि बाळू डोंगरे यांच्यामध्ये वाद होता. या वादाचे रूपांतर हाणामारी मध्ये झाले आणि यात बाळू डोंगरे यांच खून झाला होता.
गाडीवरून पडून अपघात झाल्याचा बनाव करत डॉक्टरने पोलीस आणि कुटुंबीयांना माहिती दिली होती. मात्र मृतदेह पाहिल्यानंतर कुटुंबीयांचा आणि पोलिसांचा संशय बळावला. याच काळात डॉक्टर प्रमोद घुगे लातूर येथून फरार होण्यात यशस्वी झाले होते. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासासाठी तीन पथके रवाना केली होती. दोन दिवसापूर्वी हरिद्वार येथील पोलिसांच्या पथकाला डॉक्टर घुगे यांना अटक करण्यात यश मिळाले आहे. मात्र यातील दुसरा एक आरोपी अद्याप फरार आहे.
दरम्यान, आज कोर्टामध्ये डॉक्टर प्रमोद घुगे यांना हजर केला असता कोर्टाने सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. घटना कशी घडली याबाबतचा तपास करत असल्याची माहिती लातूरच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप सागर यांनी दिली आहे.
हे ही वाचा