Kurla Bus Accident मुंबई: मुंबईतल्या कुर्ल्यामध्ये काल रात्री नऊच्या सुमारास झालेल्या बेस्ट बसच्या अपघातानं (Mumbai Kurla Bus Accident) अवघा महाराष्ट्र हादरला. या अपघातात 7 जणांचा जीव गेला. तर 49 जण गंभीर जखमी झाले. त्याशिवाय बसच्या धडकेनं रस्त्यावरच्या 20-22 वाहनांचंही मोठं नुकसान झालं. या अपघातानंतर बसचालक संजय मोरेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. तसेच हा अपघात नेमका का घडला? त्यात दोषी कोण? या प्रश्नांच्या उत्तराचा शोध सुरु झाला आहे. 


कुर्ला येथील अपघातात 55 वर्षीय कणीस फातिमा अंसारी यांचाही मृत्यू झाला. ते जिथे अपघात झाला त्या रस्त्यावर असलेल्या देसाई रुग्णालयमध्ये काम करीत होत्या. काल त्या कामावर जात असताना रुग्णालयाच्या समोरच हा अपघात झाला आणि त्यांचा मृत्यू झाला. कणीस फातिमा यांचा मृतदेह मोबाईलच्या वाजलेल्या रिंगमुळे समजल्याचे स्थानिकांनी सांगितले. अपघात झाल्यानंतर आम्ही मदत करण्यास धावलो. यानंतर उभे असताना मोबाईल रिंगचा आवाज आला. आम्ही खाली वाकून बघितलं तर एक महिला बस आणि कारच्या चाकांमध्ये अडकून पडल्या होत्या. बाहेर काढल्यानंतर त्या जवळील देसाई रुग्णालयात काम करणाऱ्या कणीस फातिमा असल्याचं समोर आलं. 


फातिमा यांचा मुलगा म्हणाला, आईच्या अंगावरील दागिने गायब-


अपघातानंतर आई कणीस फातिमा यांचा मृतदेह मिळाल्यानंतर मुलगा अबिदने खानने धक्कादायक माहिती दिली. आईच्या अंगावर काही दागिने होते. पोलिसांनी पंचनामा केला, त्यावेळी काही दागिने पोलिसांनी माझ्या बहिणीकडे दिले. मात्र त्यामधले कानातले गायब होते, असं अबिद खान म्हणाला. 


क्लच समजून चुकून अॅक्सिलरेटरवर पाय-


कुर्ल्यात अपघातग्रस्त बेस्ट बसच्या चालक संजय मोरेला केवळ तीन दिवसांचं इलेक्ट्रिक वाहन चालवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं, अशीही माहिती समोर आली आहे. याआधी संजय मोरे जूनी बस चालवायचा. त्यामुळे संजय मोरेने अपघात झाला त्यावेळी क्लच समजून चुकून अॅक्सिलरेटरवर पाय दिल्यामुळे बस थांबण्याऐवजी तिचा वेग वाढला, अशी धक्कादायक माहिती देखील तपासात उघड झाली आहे. पोलीस याच दिशेने तपास करत असल्याचं सांगण्यात येत आहे.




संबंधित बातमी:


Kurla Bus Accident: कुर्ला बस अपघातानंतर बाप मदतीला धावला; अचानक हाती मुलाचाच मृतदेह आला, अंगावर काटा आणणारा क्षण!