कोलकाता : शहरातील के आर जी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एका महिला डॉक्टरच्या अमानुष बलात्कारानंतर संपूर्ण देश हादरला आहे. बलात्कार करून या महिला डॉक्टरची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर देशभरातील डॉक्टरांनी आक्रमक पवित्रा धारण केला असून या प्रकरणातील गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली जात आहे. या महिला डॉक्टरचे शवविच्छेदन करण्यात आले असून यातून धक्कादायक बाबी समोर आल्याचा दावा केला जातोय. 


महिला डॉक्टरच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमा


बलात्कारानंतर हत्या करण्यात आलेल्या महिला डॉक्टरचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. यातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याचा दावा केला जातोय. मृत डॉक्टरशी अनेकवेळा बळजबरीने शरीससंबंध टेवण्यात आल्याचा दावा केला जातोय. सकाळी 3 ते 5 वाजेदरम्यान महिलेसोबत हा प्रकार घडला आहे. बलात्कार पीडित महिला डॉक्टरच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमा आहेत. या महिलेच्या ओठांवर, नाकावर, गाल, जबडा तसेच शरीरावर अनेक ठिकाणी जखमा आहेत. या डॉक्टरच्या डोक्यालाही मार आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार पीडित डॉक्टरचे तोंड बंद करण्यात आले होते.


अनेकवेळा करण्यात आला बलात्कार- डॉक्टर 


मिळालेल्या माहितीनुसार आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी सुवर्मा गोस्वामी यांनी बलात्कार पीडित महिला डॉक्टरच्या शवविच्छेदनाचा अहवाल पाहिला आहे. त्यांच्या दाव्यानुसार पीडित महिलेवर अनेकवेळा अत्याचार करण्यात आला. पीडित महिलेवर क्रुरपणे अत्याचार करण्यात आला. तेथे एकापेक्षा अधिक लोक होते. पीडित डॉक्टरवर अनेकवेळा लैंगिक अत्याचार करण्यात आला. दुष्कर्म केल्यानंतर या डॉक्टरचा गळा दाबून खून करण्यात आला.






बलात्कार प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे


दरम्यान, या बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे पश्चिम बंगालसह संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. सध्या कोलकाता शहरात तणावाची स्थिती आहे. 


हेही वाचा :


Ayushmann Khurrana : 'काश! मैं भी लड़का होती', कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणावर आयुष्मान खुरानाची कविता, एक-एक शब्द ऐकून अंगावर येईल काटा


Kolkata Doctor Case : कोलकाता 'निर्भया कांड'वर बॉलिवुड सेलिब्रिटींची संतप्त प्रतिक्रिया; स्वरा भास्कर, आलिया भटसह इतर कलाकारांची सरकारकडे मागणी


Asaram Bapu : आसाराम 7 दिवसांच्या पॅरोलवर बाहेर, पुण्याच्या माधवबागमध्ये उपचार घेणार