Kamshet Ghat Accident पुणे : कार्तिकी एकादशीच्या (Kartiki Ekadashi) पवित्र वारीला निघालेल्या वारकऱ्यांवर काळाने घाला घातला आहे. कामशेत घाटात (Kamshet Ghat Accident) वरच्या बाजूने उतरत असलेल्या कंटेनरने वारकऱ्यांच्या दिंडीत घुसत एकाला जागीच ठार केलं, तर आठ वारकरी गंभीर जखमी झालेत. ही दुर्घटना जुना मुंबईपुणे महामार्गावरील कामशेत घाटात घडली असून, उरण येथील श्री दावजी पाटील दिंडी आळंदीच्या कार्तिकी वारीसाठी निघाली होती. तेवढ्यात कंटेनरवरील ताबा सुटून थेट दिंडीत घुसला आणि काही क्षणांतच श्रद्धेचा प्रवास शोकांतिकेत बदलला.

Continues below advertisement

Kamshet Ghat Accident : क्षणांतच श्रद्धेचा प्रवास शोकांतिकेत बदलला

या दुर्दैवी घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तात्काळ बचावकार्य सुरू केलं, तर जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वारकऱ्यांवरचा हा दुसरा मोठा अपघात याच ठिकाणी घडल्याचे सांगितलं जातंय. तीन वर्षांपूर्वीही असाच अपघात घडला होता, बोलेरो दिंडीत घुसली होती. तेव्हाच प्रशासनाला सुरक्षा पुरविण्याची मागणी करण्यात आली होती, पण काही दिवस सुरक्षा देऊन पुन्हा वारकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्यात आलं. श्रद्धेच्या रस्त्यावर प्रशासनाची बेफिकिरी आणि वारकऱ्यांच्या जीवावर चाललेली निष्काळजी व्यवस्था यामुळे स्थानिक आणि वारऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Mumbai Crime : घाटकोपरमध्ये दोन देशी पिस्तुलं आणि चार जिवंत काडतुसेसह युवक अटक

मुंबईतील पंतनगर पोलिसांनी घाटकोपर परिसरातून एका 24 वर्षीय युवकाला दोन देशी पिस्तुलं आणि चार जिवंत काडतुसेसह अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवून अटक केली असून, आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर 12 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अटकेतील युवकाची ओळख अजय कैलास कायता (वय 24) अशी असून तो मध्यप्रदेशचा रहिवासी आहे.

Continues below advertisement

पंतनगर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका अधिकाऱ्यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, दुसऱ्या राज्यातील एक युवक मुंबईत शस्त्रांची पुरवठा करण्यासाठी येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी घाटकोपर बस डेपो जवळ, घाटकोपर-अंधेरी लिंक रोड परिसरात सापळा लावून युवकाची वाट पाहू लागले. काही वेळाने एक संशयास्पद युवक तेथे आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव अजय कैलास कायता, रहिवासी मध्य प्रदेश असे सांगितले. त्याची झडती घेतल्यावर पोलिसांना त्याच्याकडून दोन देशी पिस्तुलं आणि चार जिवंत काडतुसे मिळाली. सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, हा युवक मुंबईत कोणाकडे शस्त्रं पोहोचवण्यासाठी आला होता आणि त्याला ही शस्त्रं कोणाकडून मिळाली याचा शोध घेत आहेत.

 

संबंधित बातमी: