Kalyan Crime News Today : एका जवळच्या नातेवाईकाच्या मुलाने विनयभंग केल्याने मानसिक तणावात गेलेल्या पीडित तरुणीने थायमाईट हे विषारी द्रव्य पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना कल्याण जवळील कुंभारपाडा गावात घडली आहे. या तरुणीवर कल्याणमध्ये एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कल्याण तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी तरुणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संबधित तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
कल्याणजवळ कुंभारपाडा गावातील एक 50 वर्षाची महिला आपल्या दोन मुलींसह राहते. तिचे पती काही वर्षापूर्वी मरण पावले आहेत. ही महिला मोलमजुरी करुन आपला व मुलीचा उदरनिर्वाह करते. दिवाळी सणाच्या काळात पणत्यांना मागणी असते. या महिलेने मातीच्या पणत्या तयार केल्या होत्या. या पणत्या विक्रीसाठी ती शेजारच्या आपटी गावात गेली होती. घरी या महिलेची 21 वर्षाची मुलगी एकटीच होती. शेजारी काकांचा मुलाशी तरुणीसोबत गप्पा मारत बसला होता. तरुणीने आता दुपारची वेळ झाली आहे. तू घरी जा. मी थोडा वेळ घरात आराम करते असे सांगितले. घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेत काकाच्या मुलगा पुन्हा तरुणीच्या घरी आला. तरुणीच्या खोलीत आराम करत होती. त्या खोलीत जाऊन त्याने तरुण बरोबर लगट करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने तात्काळ त्याला दूर लोटले. घाबरुन जाऊन तरुणी शेजारी असलेल्या काकाच्या घरी गेली. त्यानंतर काकाचा मुलगा तरुणीच्या घरीच होता. संध्याकाळी आई घरी आल्यावर तरुणीने आपल्या आईला घडला प्रकार सांगितला. मुलगी आणि आई दोघेही नातेवाईकांच्या घरी जाऊन तुमचा मुलाने विनयभंग केला असल्याचे सांगितले. मात्र नातेवाईकानी
प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे दोघीही घरी परतल्या. आईने आपल्या मुलींना हा प्रकार सांगितला. रविवारी सकाळी तरुणीची आई, तिची दुसरी मुलगी घरात काम करत असताना त्यांना आपली मोठी मुलगी अजून का उठत नाही म्हणून ती तिच्या खोली गेली. तेव्हा तिला मुलीच्या तोंडाला उग्र विषारी वास येत असल्याचे दिसले. तिने मुलीला काय झाले विचारले. तिने आपण थायमाईट विषारी द्रव्य प्यायले असल्याचे सांगितले.
आईने तात्काळ गावातील एका खासगी वाहनाने मुलीला टिटवाळ्यातील महागणपती रुग्णालयात नेले. तेथून तिला कल्याण मधील श्वास रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
आणखी वाचा :
संतापजनक! सतरा वर्षीय मूकबधिर मुलीवर गावातील व्यक्तीकडूनच लैंगिक अत्याचार, आरोपी अटकेत