Kalyan Crime : नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) करत तिची गळा चिरुन हत्या केल्याचा संतापजनक प्रकार कल्याणमध्ये (Kalyan) समोर आला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हा आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान मृत मुलगी आणि संशयित आरोपी दोघेही फिरस्ता असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील न्यू मोनिका इमारतीच्या आवारात आज सकाळच्या सुमारास नऊ वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळून आला होता. स्थानिक नागरिकांनी याबाबत महात्मा फुले पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत तिची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. चौकशी दरम्यान ही मुलगी फिरस्ता असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी या परिसरातील फिरस्त्यांची चौकशी सुरु केली. चौकशी दरम्यान एका तरुणावर संशय बळावल्याने पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं. त्यानेच या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करत तिची गळा चिरुन हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. हा संशयित तरुण अल्पवयीन असल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला.
दरम्यान पीडित मृत तरुणी आणि संशयित म्हणून ताब्यात घेतलेला तरुण हे दोघे फिरस्ता असून ते स्टेशन परिसरात राहत होते. पोलिसांनी या मृत पीडितेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.
चॉकलेटच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारऑक्टोबर महिन्यात कल्याण पश्चिमेत 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर चॉकलेट देण्याचं आमिष दाखवून लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. ही मुलगी तिच्या घराच्या परिसरात खेळत असताना आरोपी संजय बनसोडेने तिला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून घरात बोलावलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. संध्याकाळी या मुलीच्या पोटात दुखू लागल्यानंतर तिने आपल्या पालकांना हा प्रकार सांगितला यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबाने बाजारपेठ पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत संजय बनसोडेला अटक केली.
टिटवाळ्यात महिन्याभरापूर्वी पाच वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचारमहिन्याभरापूर्वी टिटवाळामध्येही चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. शेजारी राहणाऱ्या 25 वर्षीय तरुणाने पाच वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचारासह पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. अत्याचार केल्यानंतर आरोपी तरुणाने पोबारा केला होता तर पीडित मुलीला उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
हेही वाचा