ठाणे : शिवसेना (Shivena) शिंदे गटाच्या माजी नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दोन महिन्यापूर्वी उगले यास एका महिलेने पक्षाच्या कार्यक्रमानंतर भररस्त्यात चोप दिला होता. शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक मोहन उगले याच्यावर महिलेचा छळ करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी कल्याण बाजारपेठ पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनं कल्याणमधील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.   मोहन उगले वारंवार पीडित महिलेला वाईट नजरेने पाहून तिचा मानसिक छळ करत असल्याचा आरोप महिलेने केला आहे. तसेच, मला येता-जाता वाईट नजरेने पाहतात आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांना धरुन माझ्यावर दबाव टाकतात. मला आत्महत्या करण्यास उगले यांच्याकडून प्रवृ्त्त केलं जात असल्याचेही पीडित महिलेने म्हटलं आहे. याप्रकरणी, महिलेच्या फिर्यादीवरुन कल्याण बाजार पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वी एका महिलेने मोहन उगले यास भर रस्त्यात चप्पलने मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता, ही घटना ताजी असताना पुन्हा एकदा शिंदे गटाचा माजी नगरसेवक मोहन उगलेवर एका महिलेचा विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. 

Continues below advertisement

2 महिन्यांपूर्वी भररस्त्यात मारहाण

कल्याण पश्चिमेमध्ये राणी कपोते या महिलेचं मोहन उगले यांना भररस्त्यात जबर मारहाण केली होती. कल्याण पश्चिमेतील मोहिंदर सिंग काबूल सिंग परिसरात एका रस्त्याच्या कामाचा शुभारंभ होता. हा कार्यक्रम रविवारी संध्याकाळी पार पडला. या कार्यक्रमाला कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर हे काही कामानिमित्त बाहेर असल्याने त्यांचे सुपुत्र वैभव भोईर यांच्या उपस्थितीत पार पडला. त्याठिकाणी माजी नगरसेवक मोहन उगले यांच्यासह शिवसेना पक्षाच्या महिला कार्यकर्त्याही उपस्थित होत्या. त्यातच, रस्ते कामाच्या श्रेयवादावरून वाद सुरु झाला अन् मारहाणीत रुपांतरीत झाला. कामाचा पाठपुरावा आपण केला, असा दावा राणी कपोते यांनी केला. तर, माजी नगरसेवक उगले यांनी या कामाचा पाठपुरावा मी केल्याचा दावा केला होता. त्यावरुन, झालेल्या वादातून उगले यांना महिला कार्यकर्त्याकडून मारहाण करण्यात आली होती.

हेही वाचा

धक्कादायक! सिंधुदुर्गच्या जंगलात नेपाळी युवकाचा सांगाडा; बॅगेतील मोबाईल अन् घड्याळावरुन गुढ उकललं

Continues below advertisement