Numerology Of Mulank 9 : अंकज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीचा मूलांक (Mulank) हा त्याच्या स्वभाव, विचार आणि क्षमतेशी संबंधित असतो. अंकशास्त्रात (Ank Shastra) सांगितल्याप्रमाणे, व्यक्तीच्या स्वभावानुसार त्याची आवड-निवड कळते. जन्मतारखेच्या माध्यमातूनच व्यक्तीचं लक्षण, चरित्र, नातेसंबंध आणि करिअरच्या बाबतीत माहिती मिळते. आज आपण मूलांक 9 चं व्यक्तिमत्व कसं असतं हे जाणून घेणार आहोत.
अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 9, 18 आणि 27 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 9 असतो.
फार रागीट असतात
मूलांक 9 चा स्वामी ग्रह मंगळ आहे. त्यामुळेच या लोकांच्या स्वभावातच थोडाफार रागीटपणा असतो. या जन्मतारखेच्या लोकांना फार पटकन राग येतो. यामुळेच रागाच्या भरात अनेकदा यांच्या तोंडून अपशब्द निघतात.
लीडरशीप क्वालिटी आणि आत्मविश्वासू
या जन्मतारखेच्या लोकांमध्ये जन्मत:च लीडशीप क्वालिटी असते. त्यामुळेच हे लोक ज्या टीमचा हिस्सा होतात. त्या त्या ठिकाणी आपलं नेतृत्व बजावतात. यांचा आत्मविश्वास, निर्णय घेण्याची क्षमता आणि कठीण परिस्थितीतही शांत राहण्याची यांची वृत्ती यांना एक चांगलं आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व घडवण्यास जबाबदार आहे. लोक यांच्या विचारांचा आणि निर्णयाचा सगळेजण आदर करतात.
दुसऱ्यांची मदत करतात
या जन्मतारखेचे लोक दुसऱ्यांची मदत करतात. पण, ती त्यांच्या हिशोबाने म्हणजेच विवेकाने करतात. लोकांना काय हवं याच्याशी त्यांचा काहीच संबंध नसतो. तसेच, या जन्मतारखेचे लोक प्रचंड शिस्तप्रिय असतात. कोणत्याच कामात हलगर्जीपणा केलेला यांना आवडत नाही.
यांच्याशी असते घट्ट मैत्री
मूलांक 9 च्या लोकांचं नेहमी मूलांक 1 असणाऱ्या लोकांबरोबर चांगलं जमतं. याचं कारण म्हणजे या दोन्ही मूलांकामध्ये एक योद्धा असतो. कारण मूलांक 1 चा स्वामी ग्रहदेखील सूर्य आहे. सूर्याला ग्रहांचा राजा म्हणतात. त्यामुळेच राजा आणि सेनापती यांची जोडी जमते. त्याचप्रमाणे, मूलांक 6 असणाऱ्या लोकांबरोबर देखील यांचं चांगलं जमतं. मात्र, मूलांक 4 असणाऱ्या लोकांबरोबर यांचं अजिबात पटत नाही.
'हा' आहे यशाचा मार्ग
या जन्मतारखेचे लोक यश मिळवण्यासाठी अनेक उपाय करतात. यासाठी हे लोक प्रत्येक मंगळवारी लाल मसूरची डाळ मंदिरात दान करु शकता. त्याचबरोबर, हनुमान चालीसाचा जप करावा. यामुळे तुमचे कष्ट दूर होतील आणि मन शांत होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :