Jalgaon Crime News : जळगाव एमआयडीसीच्या सी-सेक्टरमधील सागर लॉज नावाच्या हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा (Police Raid) टाकून 6 महिलांची सुटका केली आहे. तर एका ग्राहकासह हॉटेल मॅनेजरला अटक केली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे एमआयडीसी परिसरातच पोलिसांनी काही दिवसांपूर्वी छापा टाकून एका हॉटेलमधून वेश्या व्यवसाय करणाऱ्या एका बांगलादेशी तरुणीला ताब्यात घेतले होते. यानंतर पुन्हा एकदा एमआयडीसी परिसरात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश झाल्याने जळगावात (Jalgaon Crime News) एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसीच्या सी-सेक्टरमधील सागर हॉटेल व लॉज येथे वेश्या व्यवसाय चालत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी एक डमी ग्राहकाला सागर लॉज येथे पाठवविले होते. सागर लॉज येथे वेश्या व्यवसाय चालत असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला.
हॉटेल मालक फरार
या लॉजमधून 6 महिला, 1 ग्राहक व हॉटेल मॅनेजर कुनाल एकनाथ येरापले (25 रा. नागसेन नगर, रामेश्वर कॉलनी, जळगाव यांना ताब्यात घेण्यात आले आहे. हॉटेल मॅनेजरला लॉजच्या मालकाबाबत विचारणा केली असता त्याने लॉजचे मालक सागर नारायण सोनवणे हे लॉजमध्ये वेश्या व्यवसाय करीता बाहेरुन महिलांना बोलावून लॉजमध्ये वेश्या व्यवसाय चालवितात असे मॅनेजरने सांगितले आहे. हॉटेल मॅनेजरला अटक करण्यात आली असून हॉटेल मालक सागर सोनवणे हा पसार झाला आहे. या पिडीत महिलांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना आशादिप वस्तीगृह जळगाव येथे दाखल केले आहे. सागर लॉजच्या मालक व मॅनेजर विरुध्द पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
धक्कादायक! छत्रपती संभाजीनगरमध्ये भावानेच संपवलं बहिणीला, 200 फूट उंच डोंगरावरुन दिलं ढकलून