Jalgaon Crime News : अलीकडेच अमेझॉन प्राईमवर (amazon prime) 'फर्जी' ही वेबसीरीज रिलीज झाली आहे. अभिनेता शाहिद कपूरने (shahid kapoor) यात मुख्य भूमिका साकारली आहे. आर्थिक अडचणीला तोंड देण्यासाठी कसा तो बनावट नोटा (Fake Indian Currency) बनवण्यास सुरुवात करतो आणि कसं झटपट आपलं आयुष्य बदलतो, याचं कथानक या वेबसीरीजमध्ये दाखवण्यात आलं आहे. मात्र आता जळगावमध्ये पोलिसांनी खऱ्या आयुष्यातील 'फर्जी'ला अटक केली आहे. हा फर्जी व्यक्ती सोशल मीडियावर बनावट नोटा (Fake Indian Currency) बनविण्याचे तंत्र पाहून घरच्या घरी नोटा बनवत होता. पोलिसांनी त्याचा भांडाफोड केला आहे. या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली असून त्याकडून दीड लाख रुपयांच्या बनावट नोटा (Fake Indian Currency) जप्त केल्या आहेत.

  


मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरापासून जवळ असलेल्या कुसुंबा गावा जवळील देविदास आढाव हा 30 वर्षीय तरुण युट्यूबवरून पाहून घरातल्या घरात भारतीय चलनाच्या बनावट नोटा बनावट होता. याबाबतची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर नोटा (Fake Indian Currency) छापणाऱ्या संशयिताला पोलिसांनी एमआयडीसीतील व्ही सेक्टर मध्ये छापा टाकून अटक केली आहे. कुसुंबा तालुक्यातील देविदास पुंडलिक आढाव (वय 30) याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


कुसुंबा येथील देविदास पुंडलिक आढाव हा भारतीय चलनाच्या नकली नोटा (Fake Indian Currency) तयार करून ते बाजारात वापर करत असल्याची माहिती विभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांना मिळाली होती. या माहितीनुसार पोलिसांनी संशयित आरोपीला पकडण्याच्या सापळा रचला होता. देविदास हा बनावट नोटा (Fake Indian Currency) घेऊन बाहेर पडत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. यानंतर त्याच्या घराची झडती घेतली असता पोलिसांना त्याच्या घरात दीड लाखांहून अधिक दोनशे आणि पाचशेच्या बनावट नोटांचे (Fake Indian Currency) बंडल सापडले. तसेच पोलिसांना नोटा (Fake Indian Currency) छापण्याचे प्रिंटरही आरोपीच्या घरात सापडले आहे. या घटनेत पोलिस आता देविदास अधाव याची सखोल चौकशी करत असून यामध्ये आणखी कोण कोण सहभागी आहेत आणि त्याने नोटा (Fake Indian Currency) कुठे वितरित केल्या आहेत, याचा तपास करत आहेत.


इतर बातमी: 


पाठांतर नसल्याने शिक्षकाचा संताप, 70 सेंकदात विद्यार्थ्याला दिले छडीचे 70 फटके; अमानुष मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल