Pune Bypoll election : कसबा मतदार संघात 11 हजार (Kasba Bypoll Election Result)  मतांनी कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर विजयी झाले. मात्र दोन दिवसांपासून त्यांच्या संदर्भातील एक कविता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. हू ईज धंगेकर असं या कवितेचं नाव आहे. कसब्याची निवडणूक पहिल्य़ा दिवसापासून बॅनरबाजीमुळे चर्चेत आहे. त्यात आता 'कसबा तो झाकी है कोथरुड अभी बाकी हे' या मजकूराचे बॅनर्स लावण्यात आले आहे. त्यासोबतच  who is धंगेकर...? धंगेकर ईज नाऊ MLA ही कविता चर्चेचा विषय ठरली आहे. 


चंद्रकांत पाटलांनी धंगेकरांना डिवचलं होतं...


भाजपने यंदा धंगेकरांना पराभूत करण्यासाठी चांगलीच फौज मैदानात उतरवली होती. रोड शो, प्रचारसभा, कोपरा सभा घेतल्या होत्या. त्याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील मैदानात उतरले होते. त्यावेळी चंद्रकांत पाटलांनी प्रचार सभेत रविंद्र धंगेकरांना चांगलंच डिवचलं होतं. भरसभेत हू ईज धंगेकर तो आमच्यासमोर टिकू शकत नाही असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर धंगेकरांचे समर्थक पेटून उटले होते त्यांनी सगळ्या कसब्यात पुणेरी पाट्या लावल्या होत्या. आज विजयानंतर त्यांनी ही कविता व्हायरल करुन चंद्रकात पाटलांना चांंगलंच उत्तर दिलं आहे. धंगेकर नाऊ.. MLA असं आता सगळीकडे व्हायरल होत आहे. 


 सोशल मीडियावर व्हायरल झालेली कविता..


Who is dhangekar?


ज्याने पाडला गणेश बिडकर,


केला गड सर,


Who is dhangekar?


ज्याने वाटायला लावले,


चांदीच्या विटा, सोन्याचे डॉलर,


Who is dhangekar?


प्रचाराला लावले RSS चे केडर,


भले-भले मोठे बिल्डर,


Who is dhangekar?


देशाचे नेते फिरवले गल्लीभर,


धास्तीने जागेच रात्रभर,


Who is dhangekar?


ज्याने अश्रू आणले ओठांवर,


बंगल्याचे ओझे पेठांवर,


Who is dhangekar?


ज्याने आठवायला लावले पुण्येश्वर,


नदीत उतरून पहाय लावले ओंकारेश्वर,


Who is dhangekar?


जबरदस्तीने पैसे वाटतो हरिहर,


नाकारता हात उचलतो आया-बहिणींवर,


Who is dhangekar?


घाम फुटलाय ज्याच्या धाकावर,


ज्याने खोबऱ्याचे तेल आणलय कपाळावर, नाकावर.


कळले का?



भाजपच्या बालेकिल्ल्यात कॉंग्रेसचा गुलाल


कसबा हा मागील 28 वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला आहे. खासदार गिरीश बापट यांच्यानंतर मुक्ता टिळकांनी कसब्याचा विकास केला.  त्यानंतर पहिल्यांदाच या मतदार संघात कॉंग्रेसने मुसंडी मारली आहे. ही निव़डणूक भाजपने मोठी प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे रविंद्र धंगेकर याचा हा विजय भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.