Jalgaon Crime News : पतीला सोडून दोन महिन्यांपासून माहेरी राहत असलेल्या पत्नीचा आणि नऊ महिन्यांच्या मुलीचा निर्घृण खून करत पतीने विहिरीमध्ये उडी मारून स्वतःही आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात देऊळगाव गुजरी (Deulgaon Gujari) येथे घडली आहे. 

Continues below advertisement

याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील (Jamner Taluka) देऊळ गाव गुजरी येथील पोलीस पाटील राजेंद्र इंगळे (Rajendra Ingle) यांची विवाहित मुलगी प्रतिभा झनके (Pratibha Zanke) या तिच्या नऊ महिन्याच्या मुलीसह आपल्या माहेरी राहत होत्या. पतीशी पटत नसल्याच्या कारणावरून त्या माहेरी राहत होत्या. या काळात पती-पत्नीमधील वाद विकोपाला गेला होता. 

पत्नी सासरी नांदायला येत नसल्याचा राग अनावर

पत्नी सासरी नांदायला येत नसल्याचा राग पतीच्या मनात खदखडत होता. याच रागात पती विशाल झनके (Vishal Zanke) हा पत्नीला भेटीसाठी तिच्या माहेरी आला होता. यावेळी घरात कोणी नसल्याने या दोघांच्या मध्ये काय वाद झाला हे समजू शकले नाही. 

Continues below advertisement

पत्नीसह मुलीची हत्या करून पतीने स्वतःला संपवले

घरातील मंडळी काही वेळानंतर घरात आले. यावेळी त्यांना प्रतिभा झनके आणि तिच्या नऊ महिन्याच्या मुलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढलून आला तर जवळच्या एका विहिरीत त्यांचा पती विशाल झनके याचा मृतदेह ही आढळून आल्याने या घटनेत आपल्या पत्नी आणि मुलीची हत्या करून पतीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. कौटुंबिक वादातून (Family dispute) एक संपूर्ण कुटुंब बेचिराख झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस (Police) या घटनेचा सखोल तपास करत आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

Bhiwandi Crime News: चोरट्याची शक्कल लपवायचा टक्कल, चोरी करुन विमानाने प्रवास करणारा हायफाय चोरटा अखेर गजाआड

Thane Crime : मुंबईत घरफोडी करून विमानाने गुवाहाटी गाठायचा; आसामचा 'हाय फ्लाईंग' चोर असा सापडला पोलिसांच्या जाळ्यात