भिवंडी :  चोर कितीही कावेबाज असला तरी पोलिसांचे हात त्याच्यापर्यंत पोहोचतातच. भिवंडीतही अशाच एका चोराचा कावा पोलिसांनी मोडून काढलाय. कारण हा चोरटा चोरी केल्यानंतर थेट विमानाने प्रवास (Bhiwandi Crime News)  करून पळ काढायचा. मोईनुल अब्दुल मलिक इस्लाम असे या चोरट्याचे नाव असून या चोरट्याकडून तब्बल 62 लाख 24 हजार रुपये किमतीचे 889 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे. तर या आरोपीकडून तब्बल 22 गुन्ह्याची उकल करण्यात आले असून भिवंडी गुन्हे शाखेकडून या चोरट्याची अधिक चौकशी केली जाते. 


मोईनुल अब्दुल मलिक इस्लाम हा चोरटा मूळ राहणार निवासी आशाम येथील सामरोली गावचा असून तो तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी मुंबईत अधून मधून येत असे.  मुंबई भाड्याच्या रूममध्ये राहून परिसरात बंद घरगुती घराची रेकी करत असे त्यानंतर प्लॅनिंग करून लोखंडी रॉड किंवा छेनी हातोडीने कुलूप तोडून घरात प्रवेश करुन दागिने घेऊन पसार होत असे. तसेच आपली मूळ ओळख लपविण्यासाठी विग घालून चोरी करणाऱ्या चोरटा मुळात टकला आहे . परंतु वेगवेगळ्या प्रकारचे विग घालून घरफोडी करत असल्याने तो पोलीसांना चकमा देण्यास सरस ठरत होता . त्यामुळे हा फ्लाईंग चोरटा पोलिसांसाठी डोकेदुखी झाला होता. 


2017 पासून चोऱ्यांचा धडाका


या चोरट्याने 2017 मध्ये पहिली चोरी केली आणि त्यानंतर यांनी चोरीचा धडाका लावला होता पोलिसांना या चोरट्याला पकडणे सोपे नव्हते कारण वेगवेगळ्या प्रकारचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर देखील वेगवेगळ्या इसमाची माहिती समोर येत होती.  गुन्हा केल्यानंतर हा चोरटा मोबाईल सिम कार्ड बंद करून टाकत  असल्यानं लोकेशन ट्रॅक करणे देखील पोलिसांना शक्य होत नव्हतं. एवढेच नव्हे तर चोरीचा संपूर्ण माल विक्री करून थेट आपल्या गावी विमानाने निघून जात असे एवढेच नव्हे पोलिसांना घरचा पत्ता लागला की तिथून लपण्यासाठी नागालँडमधील दिसपूर भागात जाऊन लपून बसत असे. या चोरट्याने 2017 पासून चोरीला सुरुवात केली आणि त्यानंतर एका मागे एक यांनी तब्बल 22 घरफोडी केल्या.  ज्यामध्ये भिवंडी ,कल्याण ,ठाणे भागात 19 तर मुंबई 1 आणि नवी मुंबई  2 घरफोडी केली असून या चोरट्याकडून पोलिसांनी 62 लाख रुपयांचे मुद्देमाल जप्त केले आहे . या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक देखील केली होती त्यानंतर तो जामिनावर सुटला आणि पुन्हा त्यांनी चोरीला सुरुवात केली. 


चोरट्याची शक्कल लपवायचा टक्कल


विशेष म्हणजे या आरोपीला मुळातच टक्कल होते. मात्र चोरी करताना तो विग घालून घरफोडी करत असल्याने कोणाच्याही लक्षात येत नव्हते. चोरी करण्याच्या काही दिवस आधी तो मुंबईत येऊन भाड्याने राहत असे. आधी रेकी करून चोरीचा प्लान आखायचा. आणि चोरी केल्यानंतर तो ताबडतोब मोबाइल बंद करून सोन्याची विक्री करीत होता. त्यामुळे त्याचं लोकेशन तपासणंही कठीण झालं होतं. विशेष म्हणजे सोन्याची विक्री केल्यानंतर तो  विमानाने पळ काढायचा. तर पोलिसांपासून बचाव करण्यासाठी तो नागालँड मध्ये जाऊन लपून बसत असेल परंतु पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार हा फ्लाईंग चोरटा त्याचा असाम येथील  घरी असताना भिवंडी गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी या चोरट्याच्या घरी धडकले व व त्याला त्याच्या घरातून पळून जात असताना ताब्यात घेतलं .सध्या आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. याआधी देखील नवी मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली होती अशी माहिती समोर आली आहे. अधिक तपास भिवंडी गुन्हे शाखेतर्फे करण्यात येत आहे.


हे ही वाचा :


Pune Crime News : नशेत असलेल्या मानलेल्या बहिणीवर अत्याचार केल्याने तरुणाचा खून; हिंजवडीतील थरारक घटना