Jalgaon Crime: जळगाव जिल्ह्यात एरंडोल तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. 13 वर्षीय मुलाची गळा चिरून त्याची हत्या करून त्याचा मृतदेह फेकून दिल्याची घटना खर्ची गावात समोर आल्याने खळबळ उडाली आहे. तेजस महाजन असे मृत झालेल्या मुलाचे नाव असून, ही घटना नरबळीसाठी तर झाली नाही ना? असा संशय ग्रामस्थानी व्यक्त केला आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. 

नेमकं घडलं काय?

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील खर्ची गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रिंगणगाव येथे राहणाऱ्या 13 वर्षीय तेजस गजानन महाजन या बालकाचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याचा मृतदेह शेजारच्या खर्ची गावाजवळ एका शेतात सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही हत्या नरबळीच्या उद्देशाने तर करण्यात आली नाही ना, असा संशय आता ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सोमवारच्या बाजारात संध्याकाळी फिरत असताना तेजसने एका दुकानावर जाऊन बिर्याणी घेतली .नंतर संध्याकाळी सात वाजल्यापासून तर कोणालाच दिसला नाही .बेपत्ता झाला .त्यामुळे गावात शोधकार्य सुरू झालं .जवळपास पहाटे तीन वाजेपर्यंत सर्वांनी तरुणाला शोधलं . पण तो सापडला नाही . बाजार परिसर थोडा आत असल्यामुळे  तिथे कोणाचे लक्ष गेलं नाही .मात्र नंतर एका व्यक्तीला मृतदेह आढळून आला .त्या व्यक्तीने पोलिसांना कळवल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते . अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.

मुलाची गळा चिरून हत्या

तेजस महाजन हा आपल्या कुटुंबासह रिंगणगाव येथे राहत होता. 16 जूनपासून तो बेपत्ता झाला होता. मुलगा सापडत नसल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. परंतु कुठेही काही माहिती मिळाली नाही. अखेर आज रोजी एरंडोल पोलीस ठाण्यात तेजस हरवल्याची नोंद करण्यात आली होती. पोलिसांनीही परिसरात शोधाशोध सुरू केली होती.दरम्यान, खर्ची गावाजवळील एका शेतात तेजसचा मृतदेह आढळून आला. त्याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. या अमानुष प्रकारामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीमलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आलं. या घटनेमागे नेमकं कारण काय, याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

गळा दाबून मंगळसूत्र ओरबाडलं, नवऱ्याचं डोकं फोडलं

शिरूर तालुक्यातील मानूर जवळील तुपे वस्तीवर मध्यरात्रीच्या सुमारास दरोडेखोराने सशस्त्र दरोडा टाकत पती-पत्नीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे .आजूबाजूच्या घरांना बाहेरून कड्या लावत भगवान तुपे यांच्या घराचे दार तोडूनच प्रवेश केला .त्यांच्या पत्नीचे तोंड दाबून गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडले . नंतर पतीच्या डोक्यातही धारदार शस्त्राने वार करून डोके फोडले . गळ्यातील मंगळसूत्रासह घरातील दोन तोळे दागिने घेऊन चोरटे पसार झाले .  महिलेच्या पाकिटातील रोख दहा हजार रुपयेही चोरट्यांनी लंपास केले .या संपूर्ण घटनेने परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे .