Indapur Accident : इंदापूर तालुक्यातील (Indapur Accident) डाळज नंबर 1 येथे बगॅस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पुणे सोलापूर मार्गावर पलटी झाला. या पलटलेल्या ट्रॉली उचलण्यासाठी जेसीबीची (JCB) मदत घेत असताना एका बाजूने धीम्या गतीने वाहतूक सुरु होती. अशातचं पुण्याकडून (Pune) सोलापूरकडे (Solapur) भरधाव वेगात निघालेल्या ट्रकने पाठीमागून जोरात धडक दिल्याने दहा ते बारा वाहनांची एकमेकांना धडक बसलीय. ही घटना रात्री साडेदहाच्या सुमारास घडलीय. 


सुदैवाने यात कोणतीही जीवीतहाणी झाली नाही


अधिकची माहिती अशी की, या अपघातात दहा ते बारा वाहनांच नुकसान झाले असून महामार्ग पोलीस वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने पाठीमागून वेगात येऊन पुढील वाहनांना जोरात धडक दिल्याने दहा ते बारा वाहने एकमेकांना धडकून अपघात झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहाणी झाली नाही. 


अलिबागमध्ये हिट अँड रनची पुनरावृत्ती 


अलिबाग रेवस मार्गावर चोंढी गावाजवळ भरधाव अलिशान बीएमडब्ल्यू कार गॅरेजमध्ये घुसल्याची घटना घडली आहे. गॅरेजमध्ये काम करत असलेल्या मेकॅनिकसह 2 ग्राहकांना कारने धडक दिली आहे. या अपघातात  तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. बीएमडब्ल्यू कार चालकाचा बेजबाबदारपणा समोर आलाय. अलिबागमधील आज संध्याकाळची घटना समोर आली आहे. अलिबाग रेवस मार्गावरील हॉटेल साई इन हॉटेल जवळील डे-फार्म जवळ प्रकार घडला. बीएमडब्ल्यू कार चालकासह जखमी गॅरेज मालक आणि इतर दोघे ही अलिबाग तालुक्यांतीलच रहिवाशी आहेत. जखमींवर अलिबागमधील  जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. बीएमडब्ल्यू कार चालक संदीप विलास गायकवाड(वय 41,रा. चोंढी- अलिबाग जि. रायगड) यांच्या विरोधात अलीबागच्या मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 






इतर महत्त्वाच्या बातम्या 


Jalna Crime : इन्स्टाग्रामवर मैत्री करुन ब्लॅकमेल केलं, तरुणाच्या जाचामुळे नैराश्यात गेलेल्या 17 वर्षीय मुलीने गळ्याला दोर लावला


Chandrapur Crime : पोलीस असलेल्या वर्गमित्राने काटा काढला, हत्या करुन मृतदेह शौचालयाच्या टाकीत लपवला, चंद्रपुरात 36 वर्षीय महिलेचा गळा आवळून खून