Crime News : उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) बांदा येथे एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी  पाठवून या प्रकरणाचा तपास सुरू केला. प्रथमिक माहितीनुसार, मृत तरुणाचे शेजारी राहणाऱ्या एका विवाहित महिलेशी अनैतिक संबंध होते. दरम्यान, या महिलेने फोन केल्याने तो तिला भेटण्यासाठी गेला होता. परंतु, याच महिलेने आपल्या पतीच्या मदतीने तरुणाची हत्या (Murder) केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. अरुणेश मिश्रा असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. 


मृत तरुणाच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तसेच, संशयित आरोपी पती-पत्नीला अटक केली. बाबेरू कोतवाली परिसरातील सतान्या गावात हे प्रकरण उघडकीस आले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 डिसेंबरच्या रात्री अरुणेश मिश्रा अचानक बेपत्ता झाला. बर्याच ठिकाणी शोधून देखील कुटुंबीयांना तो मिळून आला नाही. त्यामुळे पोलिसांत मिसिंग दाखल करण्यात आली. अरुणेशचा शोध सुरु असतानाच त्याचा मृतदेह सरकारी शाळेच्या आवारात आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असता, ही हत्या असल्याचे स्पष्ट झाले होते. 


पती-पत्नीने मिळून कायमचं संपवलं...


पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मयत अरुणेशचे शेजारी राहणाऱ्या एका विवाहित महिलेशी अनैतिक संबंध होते. याबाबत महिलेच्या पतीला कळताच त्याने अरुणेशला कायमचं संपवण्याच ठरवले. यासाठी त्याने पत्नीला देखील सोबतीला घेतली. दरम्यान, संबंधित महिलेने अरुणेशला फोन करून घरी बोलावून घेतले. त्यानंतर पती-पत्नी दोघांनी मिळून त्याचा गळा आवळून हत्या केली. तसेच, मृतदेह सरकारी शाळेच्या आवारात फेकून दिला. 




पोलिसांकडून दोन्ही आरोपींना अटक 


याप्रकरणी पोलीस उपअधीक्षक लक्ष्मी निवास मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबेरू कोतवाली परिसरातून एक तरुण बेपत्ता झाला होता. त्याच्या कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्याची नोंद पोलिसांत केली होती, त्यामुळे त्याचा शोध सुरू होता. त्याच मृतदेह एका शाळेच्या आवारात आढळून आले. तपासात मृत तरुणाचे गावातील एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे समोर आले आहे. महिलेने मयताला जवळच्या शाळेत भेटण्यासाठी बोलावले होते. तसेच, तिथे गेल्यावर त्याचा गळा आवळून खून करण्यात आला, असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणात दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Ahmednagar Crime News : अकोले : अल्पवयीन मुलीची छेड काढली, जमावाच्या हल्ल्यात अण्णा ठार, चार महिलांना संपवल्याच्या प्रकरणातही होता आरोपी