Lawrence Bishnoi: राज्यात सध्या महाराष्ट्राचे नेते बाबा सिद्ध की यांच्या हत्येनंतर मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय. पोलीस हवालदाराचा मुलगा असणारा कुख्यात गुन्हेगार लॉरेन्स बिश्नोई याची टोळी एका मागून एक मोठ्या घटना घडवत आहे असा संशय बळावलेला असताना हा लॉरेन्स बिश्नोई कोण? तो गँगस्टर कसा बनला? असा प्रश्न अनेकांना पडतोय. लॉरेन्स बिश्नोईच्या प्रेम प्रकरणात या मागचं रहस्य दडलय. प्रेयसीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर असूया आणि बदल्याच्या भावनेतून लॉरेन्स बिश्नोईने गुन्हेगारीलाच त्याचा जग बनवलं. 


प्रेम कहाणीचा अंत ठरला बिश्नोईच्या गुन्हेगारीची सुरुवात 


2008 साली विष्णूच्या प्रेम कहाणीला सुरुवात झाली. त्यावेळी तो दहावीत शिकत होता. शाळेत असताना पोरवयात वर्गातील एखादी मुलगी आवडू लागते तशीच बिश्नोईला त्याच्या वर्गातील काजल ही मुलगी आवडू लागली. शाळेत अत्यंत स्टायलिश राहणाऱ्या लॉरेन्स बिश्नोईवर वर्गातील अनेक मुली फिदा असायच्या. काजललाही लॉरेन्स आवडायचा. आपल्या भावनांविषयी दोघांनाही समजले तेव्हा एकमेकांचे मित्र झाले. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. 


पंजाब मधील अबोहर येथील कॉन्व्हेंट शाळेत सुरुवातीचे शिक्षण झालेला लॉरेन बिश्नोईने दहावीनंतर आपल्या प्रेयसीसोबत चंदीगडच्या डीव्ही कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं. शाळेतील प्रेम कॉलेजपर्यंत गेलं. कॉलेजमध्ये दोघेही एकत्र वेळ घालवायचे. लग्नाचे स्वप्न रंजन एव्हाना सुरू झालं होतं. आपली प्रेम कहानी सुखी संसारात बदलेल अशी दोघांनाही आशा होती. पण एक घटना घडली आणि भीष्मयीचं पूर्ण आयुष्यच बदलून गेलं.


निवडणुकीत हरला, प्रतिस्पर्धींनी प्रियसीला जाळलं 


महाविद्यालयातील विद्यार्थी संघटनेच्या निवडणूक लढवण्याचा निर्णय लॉरेन्स बिश्नोईने घेतला होता. त्यासाठी कॉलेजमध्ये बिश्नोईने त्याच्या मित्रांची जमवाजमव करत टोळी तयार केली होती. कॉलेजमध्ये प्रचंड लोकप्रियता असणारा बिश्नोई निवडणुकीत दुसरी प्रतिस्पर्धी टोळी समोर आल्याने चिडायला लागला. याच प्रतिस्पर्धी टोळीनं त्याला पराभूत केलं. लॉरेन्सचा जीव कुठे अडकला आहे ही गोष्ट त्या टोळीला माहीत होती. बिश्नोईचं आयुष्य उध्वस्त करण्यासाठी त्यांनी बिश्नोईच्या प्रेयसीला जिवंत जाळल्याचा दावा केला जातो. मात्र हा केवळ अपघात असल्याचेही सांगण्यात येतं. 


प्रेयसीला क्रूरपणे मारल्याचा बदला घेण्यासाठी...


शाळेत असल्यापासून आपल्या प्रेमाची व्यक्ती आपली प्रेयसी इतक्या निघृणपणे मारली गेली याचा राग बिश्नोईच्या मनात होता. प्रतिस्पर्धी टोळीला धडा शिकवण्यासाठी त्यानं पंजाब युनिव्हर्सिटीच्या स्टुडन्ट ऑर्गनायझेशन ची एक टोळी सक्रिय केली. त्यांना रिबॉलवर विकत घेतली आणि प्रेयसीच्या हत्येचा आरोप करत सर्वांना गोळ्या झाडून मारून टाकले. आणि क्षणार्धात बिश्नोईने गुन्हेगारीच्या जगात प्रवेश केला.