Hingoli Crime News : हिंगोली जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून, पतीनेच पत्नीची हत्या (Murder) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे पत्नीची हत्या केल्यावर आरोपीने तीचा मृतदेह दोरीने बांधून लटकवून ठेवला होता. शेती विकून ट्रॅक्टर खरेदी करण्यास पत्नीने विरोध केल्याने पतीने एवढ्या टोकाचे पाऊल उचलले असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. विश्रांती ज्ञानोबा चव्हाण असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव असून, ज्ञानोबा चव्हाण असे आरोपी पतीचे नाव आहे. 


अधिक माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यातील कुडाळ येथे ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी शेती विक्री करू देत नसल्याच्या कारणावरून पतीनेच पत्नीचा गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वसमत तालुक्यातील कुडाळ येथील विश्रांती ज्ञानोबा चव्हाण यांचा पाच वर्षांपूर्वी ज्ञानोबा चव्हाण सोबत विवाह झाला होता. मागील काही दिवसांपासून ट्रॅक्टर खरेदी करण्याच्या कारणावरून  दोघांमध्ये वाद सुरु होते. शेती विक्री करून ट्रॅक्टर खरेदी करण्याचा निर्णय ज्ञानोबा चव्हाण यांनी घेतला होता. परंतु शेती विक्री करायला त्यांच्या पत्नी विश्रांतीचा विरोध होता. याच कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद झाले होते. तर, आरोपी ज्ञानोबाने टोकाची भूमिका घेत रागाच्या भरात पत्नी विश्रांतीचा गळा दाबून खून केला. तसेच, मृतदेह दोरीने बांधून लटकवून ठेवला होता. याप्रकरणी हट्ट पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पती-पत्नीमध्ये सतत वाद...


विश्रांती आणि ज्ञानोबा यांचे पाच वर्षांपूर्वी लग्न झाले होते. दोघांमध्ये सर्वकाही सुरळीत सुरू असताना, मागील काही दिवसात नव्या वादाला सुरुवात झाली. शेत विकून नवीन ट्रॅक्टर घेण्याची ज्ञानोबा यांची इच्छा होती. त्यामुळे यासाठी मागील काही दिवसांपासून त्यांच्याकडून प्रयत्न सुरू होते. मात्र, दुसरीकडे शेती विकून ट्रॅक्टर घेण्यास पत्नी विश्रांतीचा नकार होता. याच कारणावरून पती-पत्नीमध्ये मागील काही दिवसांत वाद होत होते. दरम्यान, हाच वाद एवढ्या टोकाला गेला की, ज्ञानोबा यांनी पत्नीची गळा दाबून हत्या केली. एवढेच नाही तर हत्या केल्यावर पत्नीचा मृतदेह घरात लटकून ठेवला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच पोलिसांनी खुनाचा गुन्हा देखील दाखल केला.


घटनास्थळी पोलीस दाखल... 


पतीने पत्नीची हत्या करून घरात मृतदेह लटकावून ठेवल्याची घटना उघडकीस आल्यावर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच, पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. तसेच, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी देखील घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आहे. तसेच, या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Crime News : चार वर्षे 'लिव्ह इन' मध्ये राहणाऱ्या महिलेने प्रियकराला संपवलं, विवस्त्र करून केली होती मारहाण