Gujrat Heroin Seized : गुजरात एटीएसने (Gujrat ATS) मोठी कारवाई करण्यात यश मिळवलं आहे. गुजरात एटीएस आणि भारतीय तटरक्षक दलाने (Indian Coast Guard) पाकिस्तानी बोट (Pakistani Boat) पकडून 350 कोटी रुपयांचे हेरॉइन जप्त केलं आहे. गुजरात एटीएसने आज भारतीय तटरक्षक दलासोबत मिळून संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे. एटीएस आणि भारतीय तटरक्षक दलाने अरबी समुद्रात पाकिस्तानी बोट पकडली आहे. त्यावर 350 कोटी रुपये किमतीचं हेरॉईन सापडलं. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या या बोटीतून 50 किलो हेरॉईन जप्त करण्यात आलं असून त्याची किंमत 350 कोटी रुपये आहे. बोटीवरील सहा जणांना अटक करण्यात आली आहे. 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय तटरक्षक दलाच्या (ICG) अधिकाऱ्यांनी माहिती देत सांगितलं आहे की, भारतीय तटरक्षक दलाला पाकिस्तानी बोटीची माहिती मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर त्यांनी शनिवारी सकाळी 'अल सक्र' या पाकिस्तानी बोटीवरील 350 कोटी रुपयांचं हेरॉइन जप्त करण्यात आलं. यासोबत बोटीवरील सहा जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. जप्त केलेली पाकिस्तानी बोट कच्छ येथे आणण्यात येत आहे.






एका वर्षात सहावी कारवाई 


भारतीय तटरक्षक दलाची गेल्या वर्षभरातील एटीएससोबतची ही सहावी कारवाई आहे. त्याचबरोबर गेल्या महिनाभरात दुसऱ्यांदा एटीएसला अंमली पदार्थ विरोधी कारवाईला यश मिळाले आहे. यापूर्वी 14 सप्टेंबर रोजी पाकिस्तानी बोटीतून सुमारे 200 कोटी रुपयांचे 40 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले होते.


दुबईतून आलेले 200 कोटीचे ड्रग्ज जप्त


त्याआधीही एटीएसने सप्टेंबर महिन्यात मोठी कारवाई केली होती. गुजरात एटीएस आणि डीआरआयने कोलकाता येथे केलेल्या कारावाईत तब्बल 200 कोटीचे ड्रग्ज जप्त केले आहे. स्क्रॅप बॉक्समध्ये 40 किलो ड्रग्ज दुबई येथून  भारतात आणले जात असल्याची माहिती मिळाली होती. त्याआधारे एटीएसने कारवाई करत 200 कोटीचे ड्रग्ज जप्त केले. दुबईवरून आणलेले हे ड्रग्ज गिअर बॉक्समध्ये लपवण्यात आले होते. 


महत्त्वाच्या इतर बातम्या