Mira Road Crime News: मिरा रोडच्या (Mira Road News) काशीमिरा परिसरात कुविख्यात पटेल कंपनीच्या सुनेनं तात्या पटेल (Tatya Patel) आणि त्याच्या मुलाविरोधात काशीमिरा पोलीस ठाण्यात (Kashimira Police Station) तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घेत याप्रकरणी गंभीर कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. आपल्या तक्रारीत सुनेनं तात्या पटेल आणि त्याच्या मुलाविरोधात गंभीर आरोप लावले आहेत. पोलिसांनी पिडीतेची तक्रार लिहून घेवून, आरोपीविरोधात अनैसर्गिक संभोग, विनयभंग, हुंडाबळी, अपहरण, मारहाण सारखे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. 


मिरा रोडच्या काशीमिरा परिसरातील कुविख्यात पटेल कंपनी तशी सर्वश्रुत. अभिनेता सनी देओलचा गाजलेल्या चित्रपट घातकमध्ये ज्या कुविख्यात गुंडाची कथा दाखवण्यात आली होती, तो गुंड म्हणजे पटेल कंपनीचा म्होरक्या तात्या पटेल. त्याच्या सुनेनंच तात्या आणि त्याच्या मुलावर गंभीर आरोप केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. सुनेनं ज्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ती कलम अत्यंत गंभीर आहेत.  




अशरफ गुलाम रसुल पटेल उर्फ तात्या पटेल, याचा मुलगा हाशिर पटेल याचं पीडितेसोबत (हाशिर पटेलची पत्नी आहीन पटेल) सोबत 28 मार्च 2013 साली लग्न झालं. लग्नानंतर एका वर्षात अशरफनं तिला मारझोड करण्यास सुरुवात केली. अशरफला अंमली पदार्थाच्या सेवनाची सवय होती आणि त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. अंमली पदार्थाच्या सेवनासाठी आणि गुन्ह्यात जामीन मिळवण्यासाठी तो पिडीतेला (सुनेला) माहेरहून पैसे आणायस सांगायचा. पीडितेनं या दोघांच्या दबावापोटी तिच्या आईनं तिला दिलेलं 200 तोळं सोनंही विकलं. मात्र तरिही तात्या पटेलची भूक भागत नव्हती. 


पीडित आणि हाशिरला एक मुलगा दोन मुली आहेत. हाशिर तिच्यासोबत अनैसर्गिक संबध ठेवायचा आणि नकार दिल्यावर मारहाण करायचा. सासरा तात्या पटेलही माहेराहून सारखे पैस आणण्यासाठी पीडितेला मारहाण करायचा. या मारहाणीत अशरफचे मित्र सर्फराज इस्माईल शेख आणि मोहम्मद अशर अयुब खान हे देखील मदत करायचे. या सर्व गोष्टीला हताश झालेल्या पीडितेनं अखेर काशीमिरा पोलीस ठाण्यात पती हाशिर पटेल, सासरा तात्या पटेल, सर्फराज शेख आणि अशर अयुब खान यांच्या विरोधात भादवि कलम 377,498(a), 406, 354, 324, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता पोलीस कुविख्यात गुंड तात्या पटेल आणि त्या मुलावर काय कारवाई करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.