Gondia Crime News : गोंदिया जिल्ह्यातील एकोडी येथे अर्भकाला गावातील घरगुती विहिरीत फेकून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या घटनेमुळे एकोडीसह परिसरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, पोलिसांनी तपास हाती घेतल्यानंतर कुमारी मातेनेच हा प्रकार केल्याचे समोर आले. गंगाझरी पोलिसांनी या प्रकरणी कुमारी मातेला ताब्यात घेतले आहे.

Continues below advertisement

Gondia Crime : विहिरीत आढळला होता एक दिवसाच्या अर्भकाचा मृतदेह

एकोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मागील भागात ढिवरटोली येथील रहिवासी राजेंद्र ठाकरे हे घरातील विहिरीत पाणी भरण्यासाठी गेले असता, त्यांना एक अर्भकाचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळला. या घटनेची माहिती शेजारील लोकांना देण्यात आली. ही वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी घटनास्थळ गाठत एकच गर्दी केली.

Continues below advertisement

गंगाझरी पोलिसांनी आपल्या पथकासह तपासकार्य सुरू केले असता प्रेमप्रसंगातून गर्भधारणा झालेल्या एका अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म देताच विहिरीत फेकल्याचे समोर आले. या प्रकरणी गंगाझरी पोलिस ठाण्यात कलम 103 (1), 12, 238 भान्यासं अतंर्गत गुन्हा नोंद केला असून, त्या अल्पवयीन मुलीला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास गंगाझरी पोलीस करीत आहेत.

Gondia Crime News :  गोंदिया जिल्ह्यातील दुसरी घटना

काही दिवसांपूर्वी तालुक्यातील ग्राम डांगोर्ली येथे एक धक्कादायक प्रकार घडला. एका मातेने आपल्या 20 दिवसांच्या बाळाला नदीत फेकले. त्या घटनेचा विसर पडत नाही तोच एकोडी येथील या घटनेने पुन्हा एकदा समाज मन सुन्न केले आहे.

राज्यात हजारो पॅथॉलॉजी लॅबचं बेकायदेशीर संचालन; उच्च न्यायालयाने सात जानेवारीपर्यंत मागितले उत्तर

देशभरात रक्त तपासणी करणाऱ्या प्रयोगशाळांचे संचालन केवळ एमबीबीएस एमडी पॅथॉलॉजी डॉक्टरच करू शकतात. मात्र राज्यात हजारो पॅथॉलॉजी लॅबचं संचालन हे बेकायदेशीर रित्या डीएमएलटी आणि सीएमएलटी अभ्यासक्रम पूर्ण केलेले तंत्रज्ञ बेकायदेशीर रित्या चालवत असून ते सामान्य नागरिकांचा जीव धोक्यात घालत आहेत. असा दावा करणारी फौजदारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सामाजिक कार्यकर्ते दिगंबर पैजाडे यांनी दाखल केली आहे. यावेळी पॅथॉलॉजी लॅब संदर्भात गुजरात उच्च न्यायालयाने 17 सप्टेंबर 2010 रोजी दिलेला निर्णयाचा दाखलाही याचिकाकर्त्यांनी दिला.

या निर्णयानुसार पॅथॉलॉजी मध्ये काम करणारे हे तंत्रज्ञ म्हणजे पॅथॉलॉजिस्ट नसून ते कोणत्याही पॅथॉलॉजीचे स्वतंत्रपणे संचालन करू शकत नाहीत. वैद्यकीय परिषदेतर्फे नोंदणीकृत पॅथॉलॉजिस्टच कुठलाही रक्ताचा अहवाल प्रमाणित करू शकतो किंवा स्वतंत्र लॅबच संचालन करू शकतो. मात्र राज्यभरात हजारो तंत्रज्ञ हे स्वतःची लॅब थाटून रुग्णांच्या जीवाशी खेळत असल्याचं याचिकाकर्त्यांचे म्हणणं आहे. यावर उच्च न्यायालयाने सात जानेवारी पर्यंत राज्याचे प्रधान सचिव वैद्यकीय विभागाचे प्रधान सचिव यांच्यासह सात प्रति वाद्यांना 7 जानेवारी पर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे राज्यातील बोगस पॅथॉलॉजी लॅब चालवून रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार थांबेल असं याचिकाकर्त्याचे म्हणणं आहे.

इतर महत्वाच्या बातम्या