Suraj Chavan Wedding Gift From Jahnavi Killekar: बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणनं (Suraj Chavan) आपल्या मामाच्या मुलीसोबत लग्नगाठ बांधली. दणक्यात सूरज चव्हाणचा (Suraj Chavan Wedding) विवाहसोहळा पार पडला. सूरजच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्यापासूनच त्याचे केळवणाचे, शॉपिंगचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले. तशीच सूरज चव्हाणच्या लग्नाची पत्रिकाही सोशल मीडियावर व्हायरल झालेली. या पत्रिकेत अनेक मान्यवरांची नावं होती. त्यात सूरजसोबत बिग बॉस मराठीच्या घरात असलेल्या स्पर्धकांचीही नावं होती. मात्र, प्रत्यक्षात सूरज चव्हाणच्या लग्नाकडे मात्र, बिग बॉस मराठीतच्या पाचव्या पर्वात झळकलेले अनेक स्पर्धक अनुपस्थित असल्याचं दिसलं.  पण, त्यातच सूरजला भाऊ मानणारी मराठी अभिनेत्री (Marathi Actress) जान्हवी किल्लेकर (Jahnavi Killekar) मात्र सूरजच्या लग्नाला उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. सूरजचे लग्नापूर्वीचे सर्व विधी आणि लग्नात धम्माल करतानाचे अनेक व्हिडीओ जान्हवीनं शेअर केले आहेत.  

Continues below advertisement

जान्हवी संपूर्ण लग्नसोहळ्या अगदी सावलीसारखी सूरजसोबत वावरत होती. त्याच्या आयुष्यातल्या सर्वात मोठ्या क्षणाची जान्हवी साक्षीदार बनली. पण, या सर्व सोहळ्यावेळी जोरदार चर्चा रंगली ती जान्हवीनं सूरजला दिलेल्या गिफ्टची. साधंसुधं नाही बंर का, महागडं गिफ्ट दिलंय, जान्हवीनं आपल्या लाडक्या भावाला. जान्हवीनं ज्यावेळी सूरजला हे गिफ्ट दिलं, त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही सांगणारा होता. 

जान्हवीकडून भावासाठी खास गिफ्ट...

Bigg Boss Marathi 5 च्या घरात एकमेकांवर मात करुन पुढे जाणं, स्पर्धा करणं यासोबतच अनेक नवी नाती निर्माण झाली. शो संपल्यानंतर अनेकांनी ती नाती त्याच प्रेमानं, मायेनं जपली. त्यापैकीच एक म्हणजे, जान्हवी आणि सूरजचं भावा-बहिणीचं नातं. सूरजच्या लग्नसोहळ्यात हळद, साखरपुड्यापासून ते वरातीत नाचण्यापर्यंत जान्हवी सहभागी झाली होती. सूरजचं लग्न लागल्यानंतर तिने एक खास व्हिडीओही शेअर केला, ज्यात तिनं त्याला दिलेल्या गिफ्टची झलक पाहायला मिळाली.

Continues below advertisement

जान्हवीनं सूरजला त्याच्या आयुष्यातल्या अत्यंत महत्त्वाच्या क्षणी एक सोन्याची अंगठी भेट म्हणून दिली आहे. जान्हवीनं दिलेल्या या महागड्या गिफ्टमुळे सूरजच्या चेहऱ्यावरही आनंद दिसून आला. जान्हवीनं सूरजला गिफ्ट देतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये अंगठी देताना जान्हवीनं सूरजला विचारलं की, अंगठी आवडली का? सूरजनं आनंदानं मान डोलावली. हा खास क्षण शेअर करताना जान्हवीनं कॅप्शन दिलंय की, "माझ्या आयुष्यातील खास माणसासाठी खास गिफ्ट..." यानंतर तिनं सूरज आणि संजना, नवदाम्पत्यासोबत फोटोही काढलेत. अनेकांनी जान्हवी या सर्व कार्यात उत्साहानं सहभागी झाल्याबद्दल तिचं कौतुक केलंय. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Suraj Chavan Thanking DCM Ajit Pawar: अजित पवारांनी घरासाठी शब्द दिला अन् सूरज चव्हाणला अलिशान बंगलाच बांधून दिला; आता गुलिगत स्टारनं केलीय आभार मानणारी पोस्ट, म्हणाला...