Gondia Crime News :  'गुरु गोविंद दोनो खडे, किसके लागू पाय, बलिहारी गुरु आपकी गोविंद जिन्हो बताय' ही संत कबीर महाराजांची दोह्यामधील ओळ गुरूची महिमा दर्शविते. परंतु काही शिक्षक आपल्या शिष्यांसोबत अश्लील चाळे करतात. एक दोन नव्हे तर तब्बल आठ विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे करून वर्गातच बॅड टच करणाऱ्या शिक्षकांवर रावणवाडी पोलिसात बाललैंगिक अत्याचार अधिनियमन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात आणि शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. 


शिक्षण देण्यासोबत विद्यार्थ्यांची जडणघडण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. मात्र, शिक्षकावरच अश्लील चित्रफित दाखवल्याचा आरोप करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. संजय अग्रवाल असे अटक करण्यात आलेल्या आरोपी शिक्षकाचे नाव आहे. गोंदिया तालुक्यातील एका जिल्हा परिषद हिंदी पूर्व माध्यमिक शाळेत कार्यरत असलेल्या आरोपी शिक्षकाने पाचव्या वर्गातील समोरच्या टेबलवर बसणाऱ्या मुलींना अश्लील चित्रफित दाखविली. चित्रफित दाखवित असताना त्याने मुलींना बॅडटच देखील केले.


यासंदर्भात मुलींनी पालकांकडे तक्रार केली. मुलींनी सांगितलेल्या या प्रकाराने पालकांना धक्का बसला. त्यानंतर संतप्त झालेल्या पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली.  संबंधित पीडित विद्यार्थिनींच्या पालकांनी या घटनेची माहिती रावणवाडी पोलिसांना दिली. या प्रकरणी रावणवाडी पोलिसांनी शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून शिक्षकाला अटक केली आहे. 


पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील ताजने यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे.


कोल्हापुरातही घडला होता असाच प्रकार -


कोल्हापूरच्या (Kolhapur News)  शेळेवाडीतील विद्यालंकार शाळेत मुलींना शिक्षकानं पॉर्न फिल्म (Porn Film)  दाखवल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. विद्यार्थी आणि पालक वर्गाच्या संतापानंतर आरोपी शिक्षकाला अखेर अटक करण्यात आली. तसेच प्रकरण लपवणाऱ्या मुख्याध्यापक आणि इतरांवर कायदेशीर कारवाई होणार असल्याचा इशारा कोल्हापूरचे एसपी शैलेश बलकवडे (Kolhapur Crime)  यांनी दिला.  शालेय मुलींना अश्लील फिल्म  दाखवणाऱ्या नराधम शिक्षकाचे नाव विजयकुमार बागडी असे आहे. राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी गावात गेल्या महिन्यात ही घटना घडली आहे. सात पीडित मुलींनी  तक्रार दिल्यानंतर शिक्षकावर कारवाई करण्यात आली. आरोपी शिक्षकाचे सातारा जिल्ह्यात (Satara) बदली करण्याचे आदेश मुख्याध्यापकांनी देत घडलेल्या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संबंधित शिक्षकावर कडक कारवाई करण्याची मागणी येथील विद्यार्थिनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली होती. 


इतर महत्त्वाच्या बातम्या


Kolhapur Crime : जळालेल्या कारमध्ये मृतदेह सापडल्याने खळबळ, हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील घटना