मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोन साखळी चोरी आणि मोबाइल चोरीच्या घटनांमध्ये वाढ पाहायला मिळाली आहे. या घटना फक्त चोरी पूरत्या मर्यादित नसून यामुळे नागरिकांना गंभीर दुखापतही होत आहे तर काही प्रकरणांमध्ये जीवही गमवावा लागलेला आहे. काही दिवसांपूर्वीच रिक्षातून जाणाऱ्या एका तरुणीचा फोन हिसकावल्याने तिचा तोल गेल्याने पडून मृत्यू झाला. या घटनेवरुन याचे गांभीर्य समजते.
एका रात्री साडेसात ते आठ दरम्यानची वेळ. दोन मैत्रिणी विवियाना मॉलमध्ये काम करून आपल्या घरी निघाल्या होत्या. आज कामावरचा त्यांचा हा दुसराच दिवस होता. त्यापैकी एक होती कनमिला रायसिंग. त्यांची रिक्षा तीन महामार्गावर तीन हात नाका उड्डाणपुलाच्या जवळ असतानाच कनमिला यांना फोन आला. त्या फोनवर बोलत असतानाच अचानक बाहेरून दुचाकीवर आलेल्या 2 चोरांपैकी एकाने कनमिला यांच्या हातातला मोबाईल हिसकावला. अचानक झालेल्या या हल्ल्याने त्या घाबरल्या आणि मोबाईल पुन्हा घेण्यासाठी बाहेर झुकल्या. अश्यात त्यांचा तोल गेला आणि त्या रस्त्यावर पडल्या. यात दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. कनमिला विवियना मॉलमध्ये काम करत होत्या. त्यांचा कामाचा दुसराच दिवस होता. मात्र नशिबाने त्यांना साथ दिली नाही. केवळ 10 हजारांच्या मोबाईलमुळे त्यांना जीव गमवावा लागला. ज्यांनी हे कृत्य केले त्या चोरांना मागे काय घडले याची कल्पना देखील नव्हती.
चैन स्नॅचिंग आणि चोरी झालेली आकडेवारी
1 मे 2021 ते 21 मे 2021
- चैन स्नॅचिंग सहित चोरी - 55 गुन्हे दाखल झाल यापैकी 48 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश.
- 1 जानेवारी 2021 ते 21 मे 2021
- 300 गुन्हे दाखल झाले ज्यापैका 265 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले
- 1 जानेवारी 2020 ते 31 मे 2021
- 247 गुन्हे दाखल झाले होते त्यापैकी 206 गुन्हे उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले.
ठाण्याच पुन्हा एकदा मोबाईल चोरांमुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी कळवा रेल्वे स्टेशनजवळ एका मोबाईल चोरट्यासोबत झालेल्या झटापटीत एका महिलेचा लोकलखाली पडून मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना याच घटनेची पुन्हा एकदा पुनरावृत्ती घडली आहे. पण यावेळी ही घटना रस्त्यावर घडली. एक महिला रिक्षाने प्रवास करत असताना अचानक दोन बाईकस्वार येतात. बाईकवर मागे बसलेला महिलेच्या हातून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न करतो. पण महिला तो मोबाईल पकडण्याचा प्रयत्न करते. या झटापटीत महिला ही चालत्या रिक्षातून खाली पडते. त्यातच तिचा मृत्यू होतो.
फक्त चैन स्नॅचिंग झालेलं आकडेवारी
मे 2021
- या महिन्यात 6 चैन स्नॅचिंगचे गुन्हे घडलेत ज्यापैकी 4 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश.
- 1 जानेवारी 2021 ते 31 मे 2021
- 48 गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी 30 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश.
- 1 जानेवारी 2020 ते 31 मे 2020
44 गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी 34 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आलय. त्यामुळे तुमची जर एखादी वस्तू एखादा चोरटा चोरत असेल तर आपला जीव धोक्यात घालू नका कारण तुमची वस्तू तर परत मिळेल. मात्र, तुमचा जीव पुन्हा मिळणार नाही.