Akola News अकोला : अकोला जिल्ह्यातून अतिशय मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेत एक धक्कादायक प्रकार घडलाय. ज्यामध्ये एका 52 वर्षीय शालेय पोषण आहार बनवणाऱ्या व्यक्तीनं जिल्हा परिषदच्या शाळेत शिकणाऱ्या 9 वर्षीय मुलीवर अत्याचार (Akola Crime News) करण्याचा प्रयत्न केलाय. अकोला शहरातल्या गुडधी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणात अकोला शहरातल्या सिव्हिल पोलीस ठाण्यात शालेय पोषण आहार मदतणीस म्हणून कार्यरत असलेल्या चंद्रमणी चव्हाण याच्याविरुद्ध बाल संरक्षण कायद्याअंतर्गत विनयभंगाचा गुन्हा (Crime News) दाखल करण्यात आलाय. दरम्यान, चंद्रमणी चव्हाण हा शाळेच्या भिंतीवरून उडी मारून पळाला असल्याची माहिती समोर आली आहे.
9 वर्षीय मुलीवर अत्याचार
विदर्भातील हजारो शाळा 1 जुलैपासून सुरू झाल्या असून विद्यार्थ्यांच्या शाळेच्या पहिला दिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी स्मरणीय ठरला. यात काही शाळांनी पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे फुलं देऊन स्वागत केले. तर काही शाळांनी पहिल्याच दिवशी शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगळे कार्यक्रम ठेवून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. मात्र, अकोल्यात शाळा उघडताच चौथ्या दिवशी एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. अकोला शहरातल्या गुडधी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहार बनवणाऱ्या व्यक्तीनं 9 वर्षीय मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केलाय. चंद्रमणी चव्हाण असे या व्यक्तीचे नाव असून तो गेल्या अनेक वर्षापासून शाळेत शालेय पोषण आहार बनवण्यासाठी कार्यरत होता.
शाळेच्या भिंतीवरून उडी मारून संशयित आरोपीचा पळ
दरम्यान, 4 जुलै रोजी चंद्रमणी चव्हाण याने शाळेत शालेय पोषण आहार वाटत असताना पीडित मुलीला एका खोलीत नेलं. त्यानंतर त्याने तीचा विनयभंग करत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या 9 वर्षीय मुलीने आरडो ओरड करत संधी मिळताच घटनास्थळावरुन पळ काढला. या घटनेने भयभीत झालेली विद्यार्थीनी परत शाळेतच गेली नाही. त्यानंतर तीच्या कुटुंबियांनी तीची विचारणा केली असता, तीने तिच्या सोबत घडलेला संपूर्ण घटनाक्रम कुटुंबियांना सांगीतला. त्यानंतर संतप्त कुटुंबियांनी तात्काळ शाळेत भेट देत एकच गोंधळ घातला. तर दुसरीकडे ही बाब चंद्रमणी चव्हाणला कळताच त्याने शाळेतून पळ काढला. सध्या पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चंद्रमणी चव्हाण याच्याविरुद्ध बाल संरक्षण कायद्याअंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच फरार चंद्रमणी चव्हाणचा शोध पोलीस करत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या