Mumbai Ganeshotsav 2022 : मुंबईत दोन वर्षानंतर यंदा गणेशोत्सवाचा (Ganeshotsav in Mumbai) उत्साह दिसून येत आहे. मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पाच्या आगमन मिरवणुकीत मोठी गर्दी उसळली होती. शनिवारी, चिंचपोकळी येथील चिंतामणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपती आगमन सोहळ्यात मोठी गर्दी उसळली होती. या गर्दीचा फायदा घेत चोरांनी (Mobile Theft In Mumbai) आपली हात सफाई दाखवत भक्तांच्या मोबाइलवर डल्ला मारला. काळाचौकी पोलीस ठाण्याबाहेर (Kalachowki Police Station) मोबाइल चोरीची तक्रार दाखल करण्यासाठी गर्दी झाली होती. 


कोरोनानंतर जनजीवन पूर्वपदावर येत असताना अनेक ठिकाणी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मुंबईतही गर्दीचा फायदा घेत चोरांनी डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे. मागील काही महिन्यांपासून मोबाइल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मुंबईतील गिरणगावात मोठ्या उत्साहासाने गणेशोत्सव साजरा केला जातो. मागील काही वर्षांपासून मोठ्या उत्साहाने बाप्पाचा आगमन सोहळाही आयोजित केला जात आहे. 


यंदा कोरोनाचे संकट काही प्रमाणात दूर झाल्याने उत्सवावरील निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे गणेशोत्सव मंडळात उत्साहाचे वातावरण आहे. याचीच झलक शनिवारी, चिंचपोकळतील चिंतामणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाच्या आगमन सोहळ्यात दिसून आली. मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी झाली होती. आगमन सोहळ्यात बाप्पाच्या दर्शनासाठी  आलेल्या गर्दीचा फायदा घेत चोरांनी मोबाईल चोरी केले असल्याचे समोर आले.


बाप्पाच्या आगमन सोहळ्यानंतर काहींना आपले मोबाइल चोरीला गेले असल्याचे लक्षात आले. प्रचंड गर्दी असल्याने अनेकांना मोबाइल कोणी चोरले याचा अंदाजही बांधता येत नव्हता. काही प्रमाणात गर्दी ओसरल्यानंतर मोबाइल चोरीला गेलेल्यांनी काळाचौकी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मोबाइल चोरीची तक्रार देण्यासाठी रांग लागली होती. काहींचे महागडे फोन चोरीला गेले असल्याचे समोर आले. काळाचौकी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून सणांच्या काळात काही टोळी कार्यरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. गर्दीच्या ठिकाणी मोबाइल आणि इतर मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 


पाहा व्हिडिओ: Chintamani Ganpati Chinchpokali : चिंतामणीचं देखणं रुप पाहण्यासाठी भाविकांची झुंबड


 



 


इतर महत्त्वाच्या बातम्या: