Gadchiroli Snake Bite Case गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेत 10 ऑगस्ट रोजी घडलेल्या भीषण सर्पदंश प्रकरणी (Gadchiroli Ashram School Tragedy) अखेर मोठी कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. सर्पदंश (Gadchiroli Snake Bite Case) घटनेसंदर्भात पोलिसांनी शाळेच्या मुख्याध्यापकासह अधीक्षकाला अटक केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात जपतलाई येथील खाजगी अनुदानित आश्रम शाळेत सामूहिक सर्पदंशाच्या घटनेत तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला होता. तर काही विद्यार्थिनी जखमी झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या संदर्भात काल (12 ऑगस्ट) धानोरा पोलीस ठाण्यात मध्यरात्री पाच जणांवर विविध कलमाने गुन्हे दाखल झाले होते. त्या संदर्भात शाळेतल्या कर्मचाऱ्यांचे बयान काल संध्याकाळी उशिरापर्यंत पोलिसांनी घेतले. दरम्यान, मुख्याध्यापक प्रशांत ताटपल्लीवार आणि अधिक्षक भास्कर भोयर या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
Gadchiroli Snake Bite Case: माजी खासदार मारोतराव कोवासेसह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
दरम्यान, याप्रकरणी आतापर्यंत संस्था अध्यक्ष तथा माजी खासदार मारोतराव कोवासे आणि संस्था सचिव तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे विद्यमान अध्यक्ष विश्वजीत कोवासे यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापक यांच्यासह मुख्याध्यापक प्रशांत ताटपल्लीवार, अधीक्षक भाष्कर भोयर आणि महिला अधीक्षिका भाग्यश्री चिल्लमवार या पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी जपतलाई आश्रम शाळेला भेट देऊन येथील पाहणी केली. तेव्हा त्यांनी पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती माध्यमांना दिली. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून दोषी आणि संबंधितांवर निलंबनाची कारवाही करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Gadchiroli Tragic Incident : 10 ऑगस्टच्या रात्री नक्की काय घडले?
धानोरा येथील निवासी आश्रमशाळेत 10 ऑगस्टच्या मध्यरात्री 2 ते 2.30 वाजेच्या सुमारास विद्यार्थिनी जेवण करून झोपलेल्या असताना 6 विद्यार्थिनींना विषारी सर्पाने दंश केला.
मृत विद्यार्थिनी :
1. दीपिका लकडा (इयत्ता 6 वी)2. सुष्मिता मंडल (इयत्ता 8 वी)3. अनु कोरेटी (इयत्ता 2 री)
दीपिका मदवी (इयत्ता 5 वी), कविता किरंगा (इयत्ता 6 वी) आणि समृद्धी नैताम (इयत्ता 8 वी) यांच्यावर गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी समृद्धी नैताम हिची प्रकृती चिंताजनक आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
