Manoj Jarange Patil Defender Car: मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा आक्रमक झालेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. पश्चिम महाराष्ट्रात मनोज जरांगे जातील त्याठिकाणी त्यांचे जेसीबीतून पुष्पवृष्टी करुन किंवा अशाच भव्यदिव्य पद्धतीने त्यांचे स्वागत केले जात आहे. तर एकीकडे कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदी रद्द करण्याच्या मुद्यावरुन मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर दुसरीकडे याच यामुद्यावरुन त्यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचबरोबर मंत्री संजय शिरसाट, छगन भूजबळ आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जरांगे पाटील जोरदार हल्लाबोल करत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच मराठा समाजाकडे करोडो रुपयांच्या गाड्या आहेत, मग आरक्षण कशाला? असा सवाल केला जात असल्याचा संदर्भ देत गाड्या आरक्षण असणाऱ्या कोणाकडे नाहीत का? असा प्रतिप्रश्न विचारत जरांगे पाटील यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. तर ज्यांच्याकडे आरक्षण आहे, त्यांचे आरक्षण काढून घ्या, असे म्हणत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि बावनकुळे यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे.
Manoj Jarange Patil Defender Car: पैसे का यांच्या आईच्या नवऱ्याने पैसे दिले का?
पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, माझ्यावर जळणाऱ्याची संख्या खूप आहे. मी डिफेंडरमध्ये फिरतोय म्हणून टीका आणि गैरसमज समाजात पसरावताय. मात्र पैसे का यांच्या आईच्या नवऱ्याने पैसे दिले का? मला जात मोठी करायची आहे म्हणून माझ्यावर माझी जात प्रेम करतीय. तुला काय करायचंय, मी कोणत्याही गाडीत बसेल. माझ्या समाजाचे लेकरं मला लाल दिव्याच्या गाडीत बसलेले बघायचे आहेत. असे म्हणत जरांगे पाटील यांनी विरोधकांना चांगलाच सुनावलं आहे.
Manoj Jarange : देवेंद्र फडणवीस तुम्ही माझ्याबद्दल कितीही गैरसमज पसरवा, माझ्या मागे मराठे आहेत आणि...
सध्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले मनोज जरांगे पाटील यांचे काल (12 ऑगस्ट) साताऱ्यात आगमन झाले. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार निशाणा साधला. मराठा समाजाकडे करोडो रुपयांच्या गाड्या आहेत, मग आरक्षण कशाला? असा सवाल केला जात असल्याचा संदर्भ देत गाड्या आरक्षण असणाऱ्या कोणाकडे नाहीत का? ज्यांच्याकडे आरक्षण आहे, त्यांचे आरक्षण काढून घ्या. छगन भुजबळ आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही त्यांनी टीका केली. तसेच देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून ते म्हणाले की 'तुम्ही माझ्याबद्दल कितीही गैरसमज पसरवा, माझ्या मागे मराठे आहेत आणि त्यांच्या मागे मी आहे,' असा इशाराही त्यांनी दिला. मराठा आरक्षणाच्या मागणीवर आपली भूमिका ठाम असल्याचे जरांगे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
इतर महत्वाच्या बातम्या
