Gadchiroli News : गडचिरोलीच्या धानोरा येथील सीआरपीएफ कॅम्पमध्ये कार्यरत असलेल्या जवानाने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आज सोमवार (24 फेब्रुवारी) ही घटना घडली असून या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. गिरीराज राम नरेश किशोर (30) रा. आग्रा असे जवानाचे नाव आहे. गिरीराज हे धानोरा येथे 113 बटालियन मध्ये कार्यरत होते.


दरम्यान, गिरीराज हे कालच (23फेब्रुवारी) आपली सुटी संपवून ते धानोरा येथील सीआरपीएफ कॅम्पमध्ये कर्तव्यावर रुजू झाले होते. अशातच आज सकाळी साडेदहाच्या सुमारास स्वतःच्या डोक्यात गोळी झाडल्याने त्यांना धानोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना यावेळी मृत घोषित केले. गिरीराज यांनी हे टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या नेमकी का आणि कोणत्या कारणाने केली हे अद्याप कळू शकलेले नाही. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे. 


अन् पतीचे सुदैवाने वाचाले प्राण 


पती - पत्नीचं संसारात खटके उडतात आणि अनेकदा पतीच्या जाचाला कंटाळून पत्नी टोकाचं पाऊल उचलते, अशा घटना नेहमी घडतात. मात्र, भंडाऱ्यात पत्नी पीडित एका पतीनं टोकाचं पाऊल उचलून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. रत्नावंत गजभिये असं भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीच्या पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचं प्रयत्न करणाऱ्या पत्नी पीडिताचं नावं आहे. नदीच्या पुलावरून उडी मारली असतानाचं तिथं पोहणाऱ्या वैनगंगा तैराकी मंडळाच्या सदस्यांनी त्यांना पाण्याबाहेर काढून त्यांचा जीव वाचविला आहे.


पत्नीची हत्या करून पतीनेही संपविले जिवन


सात महिन्यांपूर्वी आंतरजातीय विवाह करून सुखी संसाराची स्वप्नं रंगविणाऱ्या एका कुटुंबाचा दुर्देवी शेवट झाला आहे. पत्नीची गळा आवळून तिची हत्या केल्यानंतर स्वतः पतीने सुद्धा आत्महत्या करून जीवन संपवील्याचा धक्कादायक प्रकार अमरावती जवळील रहाटगावच्या एका शेतात घडला आहे. अमोल सुरेशराव गायकवाड (वय 35 वर्ष) आणि शिल्पा अमोल गायकवाड (वय 32 वर्ष) असे घटनेतील मृतकांचे नावे आहेत.


आई, बाबा, पिंकीताई मला माफ करा, दोन्ही घटनांना मीच जबाबदार आहे, मी तुमचा गुन्हेगार आहे, अशी तीन वाक्यांची सुसाइड नोट लिहून अमोलने स्वतःलाही संपविले. पत्नी शिल्पा ही मरण पावल्याची खात्री केल्यानंतर तो फासावर झुलला. अन् सात महिन्यांपूर्वी आंतरजातीय प्रेमविवाह करून सुखी संसाराची स्वप्ने रंगविणाऱ्या त्या दाम्पत्याचा शेवट झाला. पतीचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत, तर पत्नीचा मृतदेह बेडवर पडून असल्याचा प्रकार रहाटगाव जवळील एका शेतातील घरात उघडकीस आला. आर्य समाज मंदिरात सात महिन्यांपूर्वी शिल्पा हिच्याशी विवाहबद्ध झालेल्या अमोलने टोकाचे पाऊल का उचलले, ते कारण अद्याप पुढे आले नाही.


इतर महत्वाच्या बातम्या