Gadchiroli Naxal गडचिरोली : सुरक्षा दलाच्या नक्षलविरोधी (Naxal) मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. सरकारने बक्षीस जाहीर केलेल्या आणि एका निरपराध इसमाच्या खुनात सक्रिय सहभाग असलेल्या दोन जहाल माओवाद्यास अटक करण्यास गडचिरोली पोलिसांना (Gadchiroli Police) यश मिळाले आहे. अनेक हिंसक कारवायामध्ये सक्रिय सहभागी असलेल्या या दोन्ही माओवाद्यांवर महाराष्ट्र शासनाने एकुण 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. 


शासनाने जाहीर केले होते एकुण 10 लाखांचे बक्षीस


गडचिरोली जिल्ह्यातील  उपविभाग भामरागड अंतर्गत पोस्टे धोडराज हद्दीतील जंगल परिसरामध्ये विशेष अभियान पथक प्राणहिताचे जवान माओवादविरोधी अभियान राबवित होते. दरम्यान त्यांना दोन संशयित व्यक्ती पोस्टे धोडराज हद्दीत घातपात करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याचे आढळून आले. त्यानंतर विशेष अभियान पथकाच्या जवानांनी त्यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्यांनंतर त्यांची अधिक चौकशी केली असता, त्यांची नावे रवि मुरा पल्लो (वय 33 वर्षे, रा. कवंडे, तह. भामरागड, जि. गडचिरोली) हा अॅक्शन टिम कमांडर आणि दोबा कोरके वड्डे (वय 31 वर्षे रा. कवंडे, तह. भामरागड, जि. गडचिरोली) हा भामरागड दलमचा पार्टी सदस्य असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. 


आतापर्यंत एकुण 81 माओवाद्यांना अटक


या दोघांचा गेल्या नोव्हेंबर 2023 मध्ये मौजा पेनगुंडा येथे झालेल्या दिनेश गावडे या निरपराध इसमाच्या हत्येमध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे ही तपासात निष्पन्न झाले आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकुण 81 माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलेले आहे.  


अटक माओवादी आरोपींची माहिती


पकडण्यात आलेला माओवादी रवि मुरा पल्लो हा 2016 पासून जनमिलिशीया पदावर भरती होऊन माओवाद्यांची कामे करित होता. त्याने 2018 पासून अॅक्शन टिम सदस्य म्हणून काम पहिले. तर 2022 मध्ये अॅक्शन टिम कमांडर म्हणून त्याने बढती मिळवत आतापर्यंत त्यांच पदावर दलममध्ये कार्यरत होता. तर या कार्यकाळात त्याने आजपर्यंत एकुण 6 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 1 चकमक, 1 जाळपोळ, 3 खून  आणि 1 ब्लास्टींग या गुन्ह्रांचा समावेश आहे. तसेच 2019 मध्ये मौजा मोरोमेट्टा जंगल परिसरात पोलीसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये त्याचा सहभाग होता.  या चकमकीत 2 माओवाद्यांना ठार करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले होते.


तर या कारवाईत पकडण्यात आलेला दूसरा माओवादी दोबा कोरके वड्डे याने 2008 पासून जनमिलिशिया पदावर भरती होऊन माओवाद्याचे काम केले. त्याच्यावर आजपर्यंत एकुण 18 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 5 चकमक, 07 खून आणि इतर 6 गुन्हाच्या समावेश आहे. महाराष्ट्र शासनाने रवि मुरा पल्लो याच्या अटकेवर 8 लाख रूपयांचे तर दोबा कोरके वड्डे याच्या अटकेवर 2 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.


इतर महत्वाच्या बातम्या