गडचिरोली: जिल्ह्यातील जंगल परिसरातील उपविभाग भामरागड अंतर्गत पोस्टे धोडराज हद्दीतील जंगल परिसरामध्ये विशेष अभियान पथक प्राणहिताचे जवान माओवादविरोधी (Naxal) अभियान राबवित असतांना त्यांना दोन संशयित व्यक्ती पोस्टे धोडराज हद्दीत घातपात करण्याच्या उद्देशाने फिरत असतांना आढळुन आले. त्यावेळी, या विशेष अभियान पथकाच्या जवानांनी (Police) दोन्ही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीनंतर दोघांनाही अटक करण्यात आली आहे. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात गडचिरोलीत (Gadchiroli) झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात हे दोघेही आरोपी असल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे.
पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये, 1) रवि मुरा पल्लो (अॅक्शन टिम कमांडर), वय 33 वर्षे, रा. कवंडे, तह. भामरागड, जि. गडचिरोली, 2) दोबा कोरके वड्डे (पार्टी सदस्य, भामरागड दलम), वय 31 वर्षे रा. कवंडे, तह. भामरागड, जि. गडचिरोली अशी त्यांची नावे आहेत. या दोघांचा नोव्हेंबर 2023 मध्ये मौजा पेनगुंडा येथे झालेल्या दिनेश गावडे या निरपराध इसमाच्या हत्येमध्ये प्रत्यक्ष सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले. गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकुण 81 माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे.
अटक माओवादी आरोपींची माहिती
1) नामे रवि मुरा पल्लो
दलममधील कार्यकाळ
सन 2016 पासून जनमिलिशीया पदावर भरती होऊन माओवाद्यांची कामे करित होता.
सन 2018 पासून अॅक्शन टिम सदस्य म्हणून काम करीत होता.
सन 2022 मध्ये अॅक्शन टिम कमांडर म्हणून बढती व आजपावेतो कार्यरत.
कार्यकाळात केलेले गुन्हे
त्याचेवर आजपर्यंत एकुण 06 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 01 चकमक, 01 जाळपोळ, 03 खून व 01 ब्लास्टींग या गुन्ह्रांचा समावेश आहे.
कार्यकाळात केलेले गुन्हे
चकमक – 01
सन 2019 मध्ये मौजा मोरोमेट्टा जंगल परिसरात पोलीसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये त्याचा सहभाग होता. या चकमकीत 02 माओवाद्यांना ठार करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले होते.
जाळपोळ – 01
सन 2022 मध्ये मौजा धोडराज ते इरपनार मार्गावरील पेनगुंडाजवळ रस्ता बांधकाम बंद करण्याच्या हेतूने कामावरील ट्रॅक्टर, ग्रेडर व जेसीबी सारख्या 19 वाहनांची जाळपोळ करण्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.
खून – 03
माहे नोव्हेंबर 2018 मध्ये मौजा इरपनार येथील निरपराध महिला नामे बेबी मडावी हिच्या हत्येमध्ये प्रत्यक्ष सहभाग.
सन 2022 मध्ये मौजा नेलगुंडा येथील निरपराध इसम नामे राजेश आत्राम याचे हत्येमध्ये प्रत्यक्ष सहभाग.
माहे नोव्हेंबर 2023 मध्ये मौजा पेनगुंडा येथे झालेल्या निरपराध इसम नामे दिनेश गावडे याचे हत्येमध्ये प्रत्यक्ष सहभाग.
इतर – 01
दिनांक 22/03/2023 रोजी नेलगुंडा जंगल परिसरात जमिनीत स्फोटके पुरुन ठेवण्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.
2) नामे दोबा कोरके वड्डे
दलममधील कार्यकाळ
सन 2008 पासून जनमिलिशिया पदावर भरती होऊन माओवाद्याचे काम केले.
सन 2019 मध्ये भामरागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन आजपावेतो कार्यरत
कार्यकाळात केलेले गुन्हे
त्याचेवर आजपर्यंत एकुण 18 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 05 चकमक, 07 खून व इतर 06 गुन्ह्रांचा समावेश आहे.
कार्यकाळात केलेले गुन्हे
चकमक –
सन 2019 मध्ये मौजा मोरोमेट्टा जंगल परिसरात पोलीसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये त्याचा सहभाग होता. या चकमकीत 02 माओवाद्यांना ठार करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले होते.
जाळपोळ –
सन 2022 मध्ये मौजा धोडराज ते इरपनार मार्गावरील पेनगुंडाजवळ रस्ता बांधकाम बंद करण्याच्या हेतूने कामावरील ट्रॅक्टर, ग्रेडर व जेसीबी सारख्या 19 वाहनांची जाळपोळ करण्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.
खून –
सन 2022 मध्ये मौजा नेलगुंडा येथील निरपराध इसम नामे राजेश आत्राम याचे हत्येमध्ये प्रत्यक्ष सहभाग.
नोव्हेंबर 2023 मध्ये मौजा पेनगुंडा येथे झालेल्या निरपराध इसम नामे दिनेश गावडे याचे हत्येमध्ये प्रत्यक्ष सहभाग.
शासनाने जाहिर केलेले बक्षीस.
1) महाराष्ट्र शासनाने रवि मुरा पल्लो याच्या अटकेवर 08 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
2) महाराष्ट्र शासनाने दोबा कोरके वड्डे याच्या अटकेवर 02 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.