Food Poisoning : बीडच्या केज तालुक्यातील उंदरी गावात पितृपक्षाच्या कार्यक्रमातील जेवणातून 60 जणांना विषबाधा झाली आहे. या सर्वांवर धारुर आणि अंबाजोगाई येथील सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात आले असून सर्व बाधितांची प्रकृती स्थिर आहे. 


अधिकची माहिती अशी की, सध्या सगळीकडे पितृ पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. याच पार्श्वभूमीवर केज तालुक्यातील उंदरी येथे भागवत ठोंबरे परिवारात पितृपक्षाचा कार्यक्रम निमित्त संबंधित व कुटुंबातील व्यक्तीसाठी जेवणाचा कार्यक्रम दुपारच्या वेळेमध्ये ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या जेवणातून संध्याकाळी 60 नागरिकांना उलटी, जुलाब आणि चक्कर येणे असा त्रास सुरू झाला. त्यानंतर त्या सर्वांना धारुर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.


गणेशोत्सवादरम्यान जेवणातून 70 विद्यार्थ्यांना झाली होती विषबाधा


जळगाव जिल्ह्यातील पारोळ्यातील शिवरे येथे गणेशोत्सवनिमित्त सारंग माध्यमिक विद्यालयात भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देण्यात आलेल्या प्रसादातून शाळेतील 70 विद्यार्थी व चार शिक्षकांना विषबाधा झाली होती. 


शिवरे येथील सारंग माध्यमिक विद्यालयात गणेशोत्सवनिमित्त भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भंडाऱ्यात डाळभात, मटकीची उसळ, माठाची भाजी व गुलाबजाम असा मेन्यू होता. सर्व विद्यार्थ्यांचे जेवण झाल्यानंतर अचानक अनेक विद्यार्थ्यांना मळमळ होऊ लागली होती. काहींना उलट्याही झाल्याने धावपळ उडाली होती. विषबाधा झालेल्या 12 ते 15 वयोगटातील एकूण 70 विद्यार्थी व चार शिक्षकांचाही समावेश होता.


इतर महत्वाच्या बातम्या


Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत फसवणूक कराल तर खबरदार! प्रशासन अॅक्टीव्ह मोडवर, गैरप्रकाराचे ३० गुन्हे दाखल