Kalyan Crime News : कल्याण पश्चिममध्ये एक 28 वर्षीय विवाहित महिलेला तिच्या सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीकडून पंधरा लाख रुपये माहेरून आणण्यासाठी दबाव टाकण्यात आला. त्यानंतर पतीने तिला बॉस सोबत शारीरिक संबंध ठेवण्याची सक्ती केली. मात्र पत्नीने नकार दिल्यानंतर पतीने तिला जाबर मारहाण करत तीन तलाक दिला. तसेच तिला घराबाहेर काढल्याची धक्कादायक घटना कल्याण येथे घडली आहे. सोहेल हनिफउद्दीन शेख असे या पतीचे नाव असून सध्या याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हे प्रकरण उजेडात येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे. 


कल्याण पूर्वेत पुन्हा एका मराठी कुटुंबाला बेदम मारहाण


कल्याण पश्चिम मध्ये अखिलेश शुक्लाने मराठी कुटुंबावर गुंडे बोलावून हल्ला केल्याची घटना ताजी असताना पुन्हा कल्याण पूर्वेत एका मराठी कुटुंबाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याण पूर्वेतील अडवली मध्ये एका अल्पवयीन मुलीची छेडछाड परप्रांतीयाने केल्याचा प्रकार समोर आला आहे. मराठी पीडित कुटुंबाने जाब विचारल्याच्या रागातून ही मारहाण करण्यात आली आहे. या घटनेची माहिती घेण्यासाठी मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर यांनी पीडित मराठी कुटुंबाच्या घरी  जाऊन भेट घेतली. मानपाडा पोलीस ठाण्यात कार्यकर्त्यांसोबत ही भेट घेतली आहे. मराठी कुटुंबावर होणारे हल्ले थांबले नाही तर पुन्हा खळखट्याक होणार असा इशारा मनसेचे माजी आमदार यांनी दिला आहे. दरम्यान, मराठी कुटुंबावर होणारे हल्ले थांबवा, आमच्या मुली सुरक्षित नाहीत, मराठी माणूस सुरक्षित नाही, मराठी माणसांनीं एकत्र येऊन अन्याय झालेल्या मराठी कुटुंबाला मदत करावी, असे आवाहन  स्थानिक महिलांनी मराठी माणसांकडे केले आहे. 


मृतदेहासोबत शारिरीक संबध ठेवल्यास बलात्कार होतो का?


छत्तीसगड उच्च न्यायालयाने मृतदेहासोबत लैंगिक संबध ठेवल्यानंतर बलात्कार होतो का याबाबात मोठं वक्तव्य केलं आहे. भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 376 किंवा लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (POCSO कायदा) अंतर्गत मृतदेहासोबत लैंगिक संबंध ठेवणे हे बलात्कार नाही. मुख्य न्यायमूर्ती रमेश सिन्हा आणि न्यायमूर्ती बिभू दत्ता गुरू यांचा समावेश असलेल्या उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने याबाबतच्या सुनावणीवेळी सांगितले की, मृत शरीरावर बलात्कार (नेक्रोफिलिया) हे सर्वात घृणास्पद कृत्य असले तरी, ते संबंधित तरतुदींनुसार बलात्काराच्या गुन्ह्यासारखे नाही. IPC आणि POCSO कायद्यांतर्गत येणार नाही. पीडिता जिवंत असतानाच अशा तरतुदी लागू होतात, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.


हे ही वाचा