मुंबई :  पॅरोलवर बाहेर आलेल्या कुख्यात गुन्हेगाराला बांधकाम व्यवसायिकाला धमकवल्या प्रकरणी अटक करण्यात आलीय.  गणेश शिंदे असं या कुख्यात गुन्हेगाराचं नाव असून त्याने बांधकाम व्यवसायिक सुधाकर शेट्टी यांना धमकावले आहे. शेट्टी यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.  तक्रार प्राप्त होताच खंडणी विरोधी पथकाने कारवाई करत गणेश शिंदेला तत्काळ अटक केली. पोलिसांनी गणेश शिंदे याचा मुलगा भावेश शिंदे ( वय,  24 ) याला देखील अटक केली आहे.


पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गणेश शिंदे याने बिल्डरकडून 50,000 रुपये घेतले होते आणि मुलाच्या साखरपुड्यासाठी आणखी रोख रकमेची मागणी करत होता. परंतु, शेट्टी यांनी आणखी जास्तीची रक्कम नाकारल्यामुळे वांद्रे, पश्चिम येथील रुग्णालयात घांनी त्यांच्या रुण्यालातील  खोलीत घुसून  खंडणीचे पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली अशी तक्रार सुधाकर शेट्टी यांनी दाखल केली आहे.   


या प्रकरणानंतर मुंबई पोलिस तुरुंग प्रशासन आणि न्यायालयाला अहवाल पाठवणार असून पॅरोलवर सुटलेला असताना असा गंभीर गुन्हा केल्या प्रकणी या संपूर्ण प्रकरणचा पोलिस तपास करत आहेत.  शिंदेवर खंडणी, खुनाचा प्रयत्न, गोळीबार, कारागृहातून पळून जाणे, पोलिस कोठडीत दारू पिणे यासह 16 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.  त्याच्यावर मकोका कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.


गणेश शिंदे याच्यावर इतक्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असतानाही न्यायालयाने त्याला पॅरोलवर सोडण्याचे आदेश कसे दिले? गणेश शिंदेवर गंभीर गुन्हे असूनही  त्याला नुकतीच 28 दिवसांची तुरुंगातून फुर्रलफ सुट्टी देण्यात आली होती.  सुरुवातीला कोणत्याही गुन्हेगाराला पॅरोलवर सोडताना  तुरुंग अधिकाऱ्यांना तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते.  मात्र शिंदेची सुटका करताना पोलिसांनी बदलापूर पोलिसांना विचारले होते. परंतु,  त्यांना शिंदेच्या गुन्हेगारी कारवायांबद्दल माहिती नव्हती. गणेश शिंदे याला  यापूर्वी 2011 मध्ये सायन येथे झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी अटक केली होती. 


काय आहे मकोका कायदा?


संघटित स्वरुपातील गुन्हे करणाऱ्या टोळींवर मकोका कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येतो. यामध्ये खून, खंडणी, अपहरण, अंमली पदार्थांची तस्करी, हप्तेवसुली, सुपारी देणे, अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश होतो. मकोका लावण्यासाठी गुन्हेगारांचा गट हा दोन किंवा त्यापेक्षा जास्त लोकांची टोळी असावी लागते


महत्वाच्या बातम्या


पुणे पोलिसांची मोठी कारवाई, दहा लाख रूपये किमतीचा टॉईजसाठा जप्त