EVM Machine Control Unit Theft : ईव्हीएम मशीन (EVM Machine) चोरीला (Theft News) गेल्याची मोठी बातमी समोर आली आहे. पुरंदर (Purandar) तालुक्यातील सासवड (Saswad) तहसील कार्यालयातून (Tehsil Office) ईव्हीएम मशीनच्या कंट्रोल युनिटची (EVM Machine Control Unit Theft) चोरी झाली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली असून त्याचा व्हिडीओ समोर आल्याने एकच खळबळ माजली आहे.
ईव्हीएम मशीनचं कंट्रोल युनिट चोरीला
सासवड शहरातील तहसील कार्यालयातील स्ट्रॉंगरूममध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या आहेत. याबाबत सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवस शनिवार आणि रविवारी तहसील कार्यालयाला सुट्टी होती. त्यावेळी आरोपींनी संधी साधली आणि ईव्हीएन मशीनचं कंट्रोल युनिट लंपास केलं.
स्ट्राँग रूमचं कुलूप तोडून चोरी
सोमवारी सकाळी आकरा वाजता तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना स्ट्राँग रूमचं कुलूप तोडण्यात आल्याचं आढळून आलं. या ठिकाणी असलेल्या ईव्हीएम मशीन मधील एक ईव्हीएम मशीनचे कंट्रोल युनिट चोरी गेले आहे. ईव्हीएम मशीनच्या कंट्रोल युनिट चोरी गेले ही अत्यंत धक्कादायक बाब आहे. यासंदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
पुरंदर सासवड येथील तहसील कचेरी येथून ईव्हीएम चोरी प्रकरणी पुण्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याकडून पाहणी केली. पुरंदर तालुक्यातील सासवड तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीनचे कंट्रोल युनिट चोरीला गेल्यानंतर आज ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आणि जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे.
सासवड येथील तहसील कार्यालयातून सोमवारी ईव्हीएम मशीनचे कंट्रोल युनिट चोरीला गेल्याचे उघड झालं होतं. चोरीला गेलेली मशीन प्रशिक्षणासाठी असल्याचं पुरंदर तहसीलच्यावतीने सांगण्यात आले आहे.
ईव्हीएम मशीनचे कंट्रोल युनिट सापडलं
सासवड तहसील कार्यालयातून चोरीला गेलेले ईव्हीएम (EVM) मशीनचे कंट्रोल युनिट सापडलं आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 24 तासांत 2 चोरट्यांनी याप्रकरणी अटक केली आहे. पोलिसांनी या दोन्ही आरोपींना कंट्रोल युनिटसह जेजुरीमधून अटक केली आहे. नेमकी त्यांनी ही चोरी कशासाठी केली याचा तपास सुरू आहे.
पुरंदर तालुक्यातील सासवड तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीनची चोरी झाली आहे. सासवड शहरातील तहसील कार्यालयातील स्ट्राँगरूममध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार आणि रविवारी अशी दोन दिवस तहसील कार्यालयाला सुट्टी होती. सोमवारी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना स्ट्रॉंग रूमचं कुलूप तोडण्यात आलेल आढळून आले. या ठिकाणी असलेल्या ईव्हीएम मशीन मधून एक ईव्हीएम मशीन चोरीला गेल्याचं समजताच एकच खळबळ माजली होती.