वाशिम : कौटुंबिक वादातून गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडताना दिसून येतात. त्यात, वैवाहिक जीवनानंतर पती-पत्नीचा वाद, त्यातूनच सासर आणि माहेरच्या लोकांचा वाद होऊन अनेकदा गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्याच्या घटना घडतात. वाशिम (Washim) जिल्ह्यातही अशीच कौटुंबिक वादातून चक्क खूनाची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Police) आरोपी विजय खेकाळे यास अटक केली आहे. पतीच्या सततच्या त्रासाला वैतागून पत्नीने घर सोडून माहेर गाठले होते. मात्र, पत्नीने माहेरहून आपल्या घरी यावे, यासाठी पतीचा आग्रह होता. त्यातूनच हा वाद मिटवण्यासाठी गेलेल्या मेहुण्यावरच जावयाने जीवघेणा हल्ला केला. त्यामध्ये, मेहुणा नारायण सांडे यांचा रुग्णालयात (Hospital) उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 
 
पत्नीला नांदायला का पाठवत नाही, या कारणावरुन पत्नीच्या सासरी व मेव्हण्याला धमकी देण्यात आली. त्यानंतर, जावयाला समजवण्यासाठी गेलेल्या मेहुण्यावरच कुऱ्हाडीने वार करुन जखमी केल्याची घटना 1 मे रोजी  शिरपूर पोलीस स्घटेशन अंतर्गत असलेल्या वाघी गावात घडली होती. मात्र, नागपूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मेव्हुणा नारायण सांडे याचा मृत्यू झाला. याप्रकरणी  वाशिम जिल्ह्यातील शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


मालेगाव तालुक्याच्या वाघी गावातील जावाई विजय खेकाळे हा नेहमी आपल्या पत्नीला दारू पिऊन त्रास देत होता. याच कारणाने पत्नी माहेरी निघून गेल्यानंतर विजय यांनी फोन करुन पत्नीच्या भावाला धमकी दिली. बायकोचा भाऊ म्हणजेच मेव्हणा असलेल्या नारायण सांडे याला विजयने फोन करुन धमकी दिली होती. याप्रकरणी जावयाला समजवण्यासाठी गेलेला मेहुणा नारायण सांडे याला कुऱ्हाडीने वार करत मारहाण केली होती. त्यानंतर, नारायण यांना जखमी अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान 8 मे रोजी  नागपूर इथे नारायणचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी  1 मी  रोजी आरोपी जावई विजय खेकाळे यास अटक केली होती. पण, नारायणचा  मृत्यू झाल्याने शिरपूर पोलिसांनी आता हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. 


हेही वाचा


Nashik : उत्तर महाराष्ट्र केसरीची गोळ्या झाडून हत्या, नाशिक-मुंबई महामार्गावर दिवसाढवळ्या गोळीबार