मुंबई : सुप्रसिद्ध सिने कलाकार निर्माता आणि व्यावसायिक असलेला सचिन जोशीला ईडीने काल अटक केली आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी सचिन जोशी याला ईडीने अटक केली आहे. ओमकार रिअ‍ॅल्टर्स प्रकरणी ईडीकडून ही कारवाई करण्यात आली आहे.


बॉलिवूड अभिनेता आणि उद्योजक सचिन जोशीला ईडीकडून अटक करण्यात आली आहे. ओमकार ग्रुप प्रमोटर्स आणि सचिन जोशीकडून करण्यात आलेल्या 100 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. अटकेची कारवाई करण्याआधी सचिन जोशीची 18 तास चौकशी करण्यात आली होती.


सचिन जोशी आणि ओमकार बिल्डरमध्ये आर्थिक गैरव्यवहाराबाबत अटक करण्यात आली आहे. सचिन जोशी आणि ओंकार समुहामध्ये सुमारे 100 कोटींची अफरातफर झाल्याचा संशय ईडीला आहे. तसेच सचिन जोशी याला आज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.


बांधकाम व्यवसायातील प्रतिष्ठीत समूह अशी ओळख असलेल्या ओमकार समुहाच्या माध्यमातून आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी सचिन जोशी याची चौकशी इडीचे अधिकारी करत आहेत. याआधी काही दिवसांपूर्वी ओमकार समुहाच्या तीन कार्यालयांवर सक्तवसुली संचालनालयाने छापे टाकले. तसेच ओमकार समुहात उच्च पदावर कार्यरत असलेल्या सदस्यांच्या घरांवर छापे टाकण्यात आले. एकाचवेळी ओमकार समुहाशी संबंधित अनेक ठिकाणी छापे पडले होते.


पाहा व्हिडीओ : Actor Sachiin Joshi ला ईडीकडून अटक ; उद्या कोर्टात हजर करणार



ईडीकडून समन्स पाठवण्यात आल्यानंतर सचिन जोशी ईडीसमोर सादर झाला नव्हता. त्यामुळे शनिवारी सचिन जोशीला ईडीच्या कार्यालयात आणण्यात आलं. ओंकार समूहाच्या आर्थिक गैरव्यव्हार प्रकरणी अजून बडी नावं भविष्यात समोर येण्याची शक्यता आहे. यामध्ये मुंबईतील मोठे बिल्डर, बडे सेलिब्रिटी ज्यांनी ओंकार समूहात पैशांची गुंतवणूक केली असेल यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.


कोण आहे सचिन जोशी?


गुटखा उत्पादक जे. एम. जोशी यांचा मुलगा अशीही सचिन जोशी याची एक ओळख आहे. तो पान मसाला, अत्तर, द्रव्य पदार्थ, दारू, गुटखा यांची निर्मिती करणाऱ्या जेएमजे समुहाचा प्रमोटर तसेच प्लेबॉय या रेस्टॉरंट आणि क्लब चेनच्या भारतीय फ्रँचायजीचा मालक आहे. काही वर्षांपूर्वी मॉडेल आणि अभिनेत्री उर्वशी सोबत लग्न करणारा सचिन जोशी हा विजय मल्ल्याचा गोव्यातील किंगफिशर नावाचा बंगला खरेदी केल्यामुळे जास्त चर्चेत आला होता.