धुळे : संकटकाळी मदतीला धावून येतो तोच खरा मित्र.. हा सुविचार आपण शाळेत असतानाच शिकलेला असतो. त्यामुळे, शालेय जीवनापासूनच मित्राचं नातं हे कुटुंबाप्रमाणेच असते. अनेकदा ज्या गोष्टी आपण आई-वडिलांजवळ बोलू शकत नाहीत, त्या मित्रापाशी बोलून मन हलकं करतो. जो सुखात सोबती असतो, तर दु:खात पाठिराखा असतो. पण, जेव्हा हाच मित्र (Friends) दगाबाज बनतो, तेव्हा मैत्री या नात्यावरच विश्वास कायमचा उडून जातो. धुळे शहरातील एका युवकासोबत अशीच घटना घडली आहे. चक्क मित्रानेच त्याला अडकवण्याचा व फसवण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली. विशेष म्हणजे लष्कर ए-तोएबा (Lashkar A Toaba) या दहशतवादी संघटनेचा संदर्भ देत ही फसवणूक करण्यात येत होती. मात्र, सायबर पोलिसांमुळे (Cyber Police) हा बनाव उघडकीस आला आहे. 


अतिरेकी संघटना लष्करी तोयबाचे अतिरेकी असल्याचे सांगून धुळ्यातील दोघा मित्रांनी मिळून एकाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आंतरराष्ट्रीय व्हॉट्सअप व्हॅर्च्युअल कॉल असल्याने पोलिसही सतर्क झाल आहेत.धुळे सायबर पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जात फसवणुकीचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना कायद्याच्या कचाट्यात आणले आहे.


धुळे येथे राहणाऱ्या इम्रान हारुन शेख या तरुणाला एका व्हाट्सअप कॉलद्वारे फोन करून त्याच्याच मित्राने फसवण्याचा प्रयत्न केला. लष्कर ए तोयबा या अतिरेकी संघटनेतून बोलत असल्याचे सांगून आमिष दाखवून इम्रानला मित्राकडूनच फसविण्याचा प्रयत्न झाला. वरवर सहज वाटत असलेलं हे प्रकरणी गंभीर असल्याची बाब लक्षात येताच, इम्रान शेखने ताबडतोब धुळे सायबर पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास करत धुळ्यातीलच त्याचा मित्र असलेल्या ऋषिकेश भांडारकर आणि त्याच्या एका साथीदाराला ताब्यात घेतले. या दोघांवरही फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हेही वाचा


बीडमध्ये ACB कारवाईचा धडाका, लाचखोरांच्या आवळल्या मुसक्या; आता ST मधील अधिकाऱ्यास रंगेहात अटक


Bhandara News : भंडाऱ्यातील धान खरेदी केंद्रात घोटाळ्यांचा सिलसिला सुरूच; कोट्यवधींच्या घोटाळ्यात तीन केंद्र चालकांना अटक